Tuesday, October 31, 2023

पिंपरी चिॅचवड महापालिका शाळांचे शिक्षण बदलतेय, नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण

हापालिका शाळांच्या शैक्षणिक कक्षा रुंदावत  आहेत. त्याचे चालते-बोलते उदाहरण आहे, पिंपरी चिॅचवड महापालिकांच्या शाळा. मुलांना शिक्षणाचे गोडी लागावी ततसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती थांबावी यासाठी महापालिका नावीन्यपूर्ण उपक्रमांचे भरवत आहे.   करिअर मार्गदर्शन देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना तणाव आणि दडपणांचा सामना करण्यास मदत करण्यासाठी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने  आपल्या नागरी शाळांसाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.  प्राथमिक शाळांमध्ये क्रीडा आणि कला शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी शाळांमध्ये वर्ग ग्रंथालयांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. शाळांमधून वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी सक्षमपणे होण्यासाठी ११ प्राथमिक आणि ६ माध्यमिक शाळांमध्ये तंत्रस्नेही, होतकरू, कार्यमग्न शिक्षकांची  निवड करण्यात आली आहे. अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्याच्या इतर कला गुणांना वाव मिळण्यासाठी प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा हा उपक्रम भरवला जात आहे. ताज्या शालेय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हास्तरावर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी  भारतदर्शन सहलीचे आयोज करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी  मनपाच्या रुग्णालयाकडून आरोग्य तपासणी केली आते आहे. एकंदरीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तसेच शैक्षणीक विकासासाठी प्रयत्नशील आहे. पिंपरी-चिंचवड मधील  महापालिका शाळांचा दर्जा बदलण्यासाठी  पिंपरी-चिंचवड महापालिका करीत असलेल्या विविध  उपक्रमांविषयी  थोडे विस्ताराने पुढे दिले आहे. यातील काही उपक्रम हे शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आहेत. तर काही उपक्रम हे  शाळांच्या प्रशासकीय बाबी व भौतिक सुविधांच्या सुधारण्यासाठी केलेले आहेत.    

डाटा एंट्री ऑपरेटर यांची नियुक्ती :  एकीकडे पालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवत आहे. मात्र, सध्या शिक्षकांना शासन, पालिकेला विविध अहवाल पाठविणे, संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचा डाटा ऑनलाइन भरणे, वैद्यकीय तपासणीची माहिती भरणे, क्रीडा विषय माहिती ठेवणे यासह विद्यार्थ्यांचा सर्व डाटा जतन करणे, संगणकावर एक्‍सेल शीटमध्ये माहिती भरणे यासह विविध कामे करावी लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी प्रशासकीय आणि इतर कामकाजात शिक्षकांचा जास्त वेळ जात आहे. यामुळे शिक्षकांचे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी १०५ डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या एकूण १०५ प्राथमिक, तर १८ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये ४२ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थीसंख्या मोठी असताना महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी पालिकेने सुमारे अडीचशे कंत्राटी शिक्षकांची भरती केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक प्राथमिक शाळेसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. 

प्राथमिक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक व कला शिक्षक नेमणूक : महापालिकेच्या सर्व शाळा स्मार्टकरण्याकडे  पालिका प्रशासनाची कल आहे. याच वेळी विद्यार्थ्यांच्या कला-क्रीडा या गुणांनाही वाव मिळणे गरजेचे आहे.  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधून गोरगरिब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  त्यांना  जास्तीचे पैसे  भरून  कला-क्रीडा आदी शिक्षण घेणे जमत नाही. त्यामुळे  पिंपरी-चिंचवड महापालिकैच्या शाळांमधून ३२ प्राथमिक शाळांसाठी प्रायोगिक तत्वावर कला शिक्षक व क्रीडा शिक्षक नेमले जाणार आहेत. या शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

समुपदेशकांची नियुक्ती :   पिंपरी चिंचवड  महापालिकेच्या १०५ प्राथमिक व१८ माध्यमिक शाळांमध्ये जवळपास ४५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. अशा विद्यार्थ्यांना आजूबाजूचे वातावरण, घरातील समस्या याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे त्यांची मानसिकता स्थिर राहत नाही. एखादा विद्यार्थी सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळा वागत असेल तर त्याला कोणत्या अडचणी आहेत, हे जाणून घेणे आवश्यक असते.  तर अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या कौटुंबीक प्रतिकूल परिस्थितीचा विचार करत त्यांना मानसशास्त्रीय समुपदेशनाचा लाभ देण्याच्या उद्देशाने सुरुवातीला महापालिकेच्या १०५  'शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.  ५ शाळांसाठी  १ समुपदेशक या प्रमाणात २१ समुपदेशकांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. हे समुपदेशक बाल मानसशास्त्र, मानसोपचार आणि समाजशास्त्रातील तज्ञ आहेत आणि त्यांनी पूर्वी शाळा आणि इतर संस्थांमधील मुलांसाठी समुपदेशक म्हणून बाल कल्याण कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.

वर्ग ग्रंथालय :   शालेय विद्यार्थ्यांमध्ये साक्षरतेला चालना देण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने १०५ पैकी ५० प्राथमिक शाळांमध्ये वर्ग ग्रंथालये उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी पिंपळे गुरव प्राथमिक शाळा क्रमांक ५४ येथे पहिल्या वर्ग ग्रंथालयांचे अनावरण  नुकतेच करण्यात आले. तुलिका, नॅशनल बुक ट्रस्ट, तसेच पराग इनिशिएटिव्ह (टाटा ट्रस्ट), रूम टू रीड आणि आकांक्षा फाउंडेशन यांसारख्या संस्थांनी या ग्रंथालयांसाठी पुस्तकांची निवड बारकाईने केली आहे. उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी, एक धोरणात्मक ग्रंथालय अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये पन्नास शाळांमधील प्रत्येकी एका शिक्षकाला सहभागी करण्यात आले. या शिक्षकांना त्यांच्या संबंधित शालेय संस्थांमध्ये ‘लायब्ररी चॅम्पियन’ होण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. तसेच दर आठवड्याला नवनवीन वाचन पद्धती अवलंबण्यात येतील. पद्धतीद्वारे शैक्षणिक परिणामांचे विश्लेषण करण्यात येणार आहे.  ५० प्राथमिक शाळांमध्ये वर्ग ग्रंथालय निर्मितीची प्रक्रिया चालू आहे.  वर्ग ग्रंथालयांसाठी एकूण १ लाख ३८ हजार पुस्तके मागविण्यात आली आहेत. ज्ञानाचा हा खजिना ठेवण्यासाठी वर्गांमध्ये ६७७ कपाटांची सोय करण्यात येणार आहे. ही वर्गातील ग्रंथालये विद्यार्थ्यांमध्ये केवळ वाचनाची आवडच वाढवणार नाहीत तर सुदृढ, सक्षम तरुण पिढी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहनही देणार आहेत. 

कोर टीम  : शाळेत वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी सक्षमपणे होण्यासाठी ११ प्राथमिक व ६ माध्यमिक तंत्रस्नेही, होतकरू, कार्यमग्न शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या शिक्षकांना अदवितीय आणि यशस्वी शैक्षणिक पद्धतींचे अनुभव देण्यासाठी सहयाद्री शाळा खेड व ज्ञान प्रबोधिनी निगडी येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर २०२३ पर्यन्त दिल्ली येथील शाळांच्या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दफ्तर विना उपक्रम : पिंपरी चिंचवड  महापालिकेच्या शाळांमधून प्रत्येक शनिवारी दप्तराराविना शाळा भरते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्व १२८ शाळांमध्ये दर शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या खांद्यावरचा भार हलका झाला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये आता गीत, कविता, गायन, प्रश्नमंजूषा, शाब्दिक खेळ, पाककला, चित्रकला, मैदानी खेळ असे विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला, तसेच पर्यावरणपूरकतेला प्रोत्साहन मिळत आहे.

दप्तराविना शाळा : विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिल्यास त्यांची शाळा उपस्थितीची गोडी वाढेल आणि आठवड्याभराच्या शारीरिक, मानसिक त्रासातून मुक्तता मिळेल, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘दप्तराविना शाळा’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची कल्पकता तर वाढलीच आहे; पण त्यांच्या कौशल्यालाही वाव मिळाला आहे. पालक आणि शिक्षकांनीही या अग्रेसर विचारसरणीचे कौतुक केले आहे. या उपक्रमाने विद्यार्थ्यांना जड दप्तरांच्या शारीरिक ओझ्यापासून मुक्ती तर मिळालीच आहे;  पण त्यांचा मानसिक भारही हलका केला आहे. जिज्ञासा आणि जीवनकौशल्ये यावर भर देऊन महापालिका शाळा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शाळेच्या वेशीपलीकडे सतत विकसित होत असलेल्या धावपळीच्या जगात हा उपक्रम पाऊल ठेवण्यास नक्कीच मदत करणार. 

भारत दर्शन सहल आयोजन :   महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यावर भर दिला जात आहे. पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षांमध्ये राज्य स्तरावर किंवा गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतदर्शन अभ्यास दौरा आयोजित केला जाणार आहे. त्यासाठीचा येण्या-जाण्यासह राहण्याचा खर्च महापालिका करेल. या अंतर्गत भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो), संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) अशा महत्त्वाच्या संस्थांसह भारतातील विविध स्थळांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. जिल्हास्तरावर कला, संस्कृती, इतिहास, संग्रहालय, विज्ञान व संशोधन विषयक स्थळांची माहिती होण्यासाठी दरवर्षी अभ्यासदौरा आयोजित केला जाणार आहे.  यंदा राज्य शालेय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हास्तरावर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना साऊथ रूट येथील ऐतिहासिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक स्थळांना भेटीचे आयोजन दि. १९ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२३  असे केले आहे.

'जल्लोष शिक्षणाचा' : पिंपरी चिंचवड महानगरपालिका - शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळेंच्या प्रयत्नांना सन्मानित करण्याच्या दृष्टीकोनातून 'जल्लोष शिक्षणाचा' उपक्रम सुरू केला आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये , ८ शाळा प्रभाग विजेत्या म्हणून निवडल्या गेल्या होत्या आणि या ८ शाळेंपैकी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची एक शाळा  सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून ओळखली गेली होती. दोन दिवस चालणाऱ्याया उपक्रमात विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारीत कला सादरीकरणाची संधीही मिळाली होती. जल्लोष शिक्षणाचा अंतर्गत  शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक गुणात्मक, नावीन्यपूर्ण विचारवाढीसाठी विद्यार्थी व शाळा स्तरावर स्पर्धा घेतल्या जातात.  थोडक्यात  'जल्लोष शिक्षणाचा' मध्ये  स्पर्धा व शिक्षणोत्सवाचे आयोजन केले जाते. 

जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ : राज्यातील पहिले संतपीठ पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आले. अल्पावधीतच संतपीठाचा लौकीक आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला आहे. सीबीएसई बोर्डाच्या माध्यमातून इंग्रजी भाषेत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबरोबरच संत साहित्याचे शिक्षण देऊन भारतीय संस्कृती व परंपरेची शिकवणे देणे हे संतपीठाचे वैशिष्टय आहे. इयत्ता ज्युनियर केजी ते सातवी पर्यंत एकूण १२५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या वेळापत्रकामध्ये शैक्षणिक विषयांसह संत साहित्य, तबला वादन, पखवाज वादन, श्लोक, अभंग, स्त्रोत, हरिपाठ पठण, संगीत, नृत्य हे विषय मुलांना शिकवले जातात. भारतभर कार्य केलेल्या अनेक संतांच्या जयंतीचे तसेच पुण्यतिथीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची माहिती दिली जाते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेला सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारी सर्वोत्कृष्ठ शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे

गुणवत्ता सुधार प्रशिक्षण :  क्वॉलिटी कंट्रोल ऑफ इंडिया यांच्यासोबत तीन वर्षांसाठी करारनामा केला आहे. यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांचे मूल्यांकन १०० टक्के केले जाते. . त्यानंतर निकालातील त्रूटी लक्षात घेऊन शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. 

प्रकल्प व्यवस्थापन ः शिक्षक, मुख्याध्यापक, सीएसआर अंतर्गत राबविले जाणारे विविध प्रकल्प यांच्यात समन्वय साधणे, माहिती आधारित नियोजन करणे, शाळांमध्ये विविध उपक्रमांचे मूल्यांकन करणे, नविन प्रस्ताव तयार करणे, शिक्षण विषयक पद्धतीमध्ये सुधारणा करणे. बालवाडी व शाळांची गुणवत्ता वाढीस मदत करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन उपक्रम राबविला जातो. त्यासाठी शिक्षण विभागात दोन व क्षेत्रीय स्तरावर पाच असे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले  जाते. 

डी. बी. टी. (Direct Benefit Transfer) - १ली - ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी रु.३५००/- व ५वी १० वी च्या विदयार्थ्यांसाठी रु.३७००/- याप्रमाणे ४१,६६० पालकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.

शाळांकरिता सारथी तक्रार पोर्टलची अंमलबजावणी - शाळांमधील भौतिक सुविधा, तांत्रिक बाबी इ. विषयक तक्रारींचे निवारण वेळेत करण्यासाठी सारथी पोर्टलद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय करण्यात आली आहे. दि.०१/०३/२०२३ ते दि. १२/१०/२०२३ या कालावधीत एकूण २४० तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी २०४ तक्रारींचे निवारण झाले आहे. 

भौतिक सुविधा अद्ययावत करणे व वॉटर फिल्ट सुविधा देणे - गेल्या वर्षी  २०२२ मध्ये ३७ प्राथमिक शाळांमध्ये भौतिक सुविधा अद्ययावत करण्याचे काम सुरू केले होते. या वर्षी ६८ प्राथमिक शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू होणार आहे. मनपाच्या सर्व शाळांतील इमारतीमध्ये वॉटर फिल्टर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 

ज्ञानमेव शक्ति: मनपा शाळांसाठी एक सारखे नाव असावे याकरिता पी.सी. एम.सी. पब्लिक स्कूल हे नाव आणि "ज्ञानमेव शक्ति:" असे ब्रीदवाक्य निश्चित करण्यात आले आहे.

ऑनलाइन शिक्षक बदली - उपशिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बाला प्रकल्प व AIप्रकल्पापैकी  ४० शाळांमध्ये बाला प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यासाठी १,२३,००० स्क्वे. मी. क्षेत्रात काम करणेत आले आहे.

मनपा तर्फे विद्यार्थी आरोग्य तपासणी - सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीसाठी मनपाच्या रुग्णालयांकडून करण्यात येईल. ही तपासणी  स्मार्ट हेल्थकेअर अंतर्गत  शैक्षणिक वर्षात जुलै, ऑगस्ट आणि डिसेंबर, जानेवारी या महिन्यांत सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठी वेळापत्रक तयार केले असून शारीरिक दोष असलेल्या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार केले जातात. 

अशाप्रकारे पिंपरी-चिंचवड महापालिका  आपल्या शाळांमधून विद्यार्थ्याचे भवितव्य उज्जवल करण्यासाठी प्रयत्नशील आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Saturday, October 28, 2023

स्वच्छ आणि शुद्ध हवेसाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रयत्न

वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता वारंवार खालावत चालली आहे. सध्या मुंबई आणि उपनगरातील  हवा अत्यंत वाईट असल्याची नोंद झाली आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये मुंबईची गणना झाली. त्यानंतर पावसाळ्यात हवेचा दर्जा काहीसा सुधारला. मात्र, मोसमी पावसाने मुंबईचा निरोप घेताच पुन्हा एकदा मुंबईच्या हवेत प्रदूषके साचून राहू लागली आहेत. देशातील प्रदूषित शहर अशीच ख्याती असलेल्या दिल्लीपेक्षाही मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. मुंबई आणि इतर उपनगरांमध्ये अशी परिस्थिती असतानाच राज्यातील काही महत्त्वाच्या शहरातही परिस्थिती काही वेगळी नाही. त्यामुळे स्वच्छ आणि शुद्ध हवेसाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कशोशीने प्रयत्न सुरु केले आहेत, त्याचाच घेतलेला हा आढावा... 

शहरात प्रदूषित हवा आणि धूळ का निर्माण होते ?

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याचे विविध संस्थांनी सादर केलेल्या अहवालांतून दिसते. दरवर्षी साधारणपणे थंडीची चाहूल लागताच मुंबईच्या हवेचा दर्जाही ढासळू लागतो. गेल्या वर्षी (२०२२) डिसेंबर, यंदा जानेवारी, फेब्रुवारीमध्ये मुंबईच्या हवेची स्थिती वाईट झाली ती अगदी मार्च अखेरपर्यंत होती. पावसाळ्यानंतर मुंबईतील वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही मुंबईच्या प्रदूषणात भर घालत आहेत. पायाभूत सुविधा, रहिवासी व  व्यावसायिक संकुले, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अति-अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात. नुकत्याच 'सरस' या पर्यावरण संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात मुंबईची हवा प्रदूषित असल्याचे जाहीर केले. 

ठराविक कालावधीत हवेतील प्रदूषकांचे प्रमाण किती त्यानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक निश्चित केला जातो. राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकानुसार एक्यूआयची स्थिती ०-१०० असल्यास ठीक, १०१-२०० असल्यास सामान्य, २०१-३०० वाईट, ३०२-४०० अत्यंत वाईट, ४०० पेक्षा जास्त असल्यास धोक्याची पातळी ओलांडलेली असून चिंताजनक परिस्थिती असते.

स्वच्छ आणि शुद्ध हवेसाठी मुंबई महापालिकेचे प्रयत्न : 

२०२३-२४ च्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात हवा प्रदूषण रोखण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. यात स्वच्छ हवेसाठी मुंबई महापालिका पाच ट्राफिक जंक्शनवर एअर प्युरिफायर बसवणार असून हे प्युरिफायर हवेची गुणवत्ता तपासणार आहेत. सक्शन मशीनच्या साहाय्याने हवा शोषून शुद्ध करून ती पुन्हा वातावरणात सोडण्यात येणार आहे. 'मुंबई क्लीन एअर क्वालिटी प्रोग्रॅम' अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.  

मुंबई महापालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ही कठोर उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या उपाय योजनेनुसार बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी १५ दिवसांत स्प्रिंक्लर आणि महिनाभरात स्मॉग गन लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही उपकरणे लावली नाहीत तर मुंबई महापालिका विकासकाला जागच्या जागी 'स्टॉप वर्क' नोटीस बजावणार आहे. महापालिकेतर्फे विशेष नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

काय आहे नियमावली 

  • एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान ३५ फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन असावे. 
  • त्या शिवाय संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपड्याने झाकलेले असावे. 
  • क्ष प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्प्रिंक्लर असावेत. 
  • धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान ४ ते ५ वेळा पाण्याची फवारणी करावी.
  • रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी ॲंटी स्मॉग मशीन लावावीत. 
  • प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी. 
  • बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मनुष्यबळाच्या संरक्षणासाठी मास्क, चष्मा इत्यादी संरक्षण साहित्य दिले जावे. 
  • डेब्रिज वाहतूक करणारे वाहन झाकलेले असावे. 
  • डेब्रिज ने-आण करताना प्रत्येक खेपेच्या वेळी तुषार फवारणी करावी. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत.

महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांतर्गत (वॉर्ड) येणाऱ्या बांधकाम ठिकाणांची पाहणी करण्यासाठी तातडीने विशेष पथके स्थापन करण्यात येणार आहेत. प्रत्येक विभागात दोन ते सहा पथके तयार करण्याच्या सूचना देण्यात येतील. पथकात दोन अभियंते, एक पोलीस, एक क्लीन-अप मार्शल असेल आणि त्यांचा प्रमुख एक पालिका अधिकारी असेल. या पथकाला एक वाहनही देण्यात येईल. पथकांनी बांधकामांच्या ठिकाणी अचानक भेट देऊन थेट  चित्रीकरण करावे आणि उपाययोजनांमध्ये कमतरता आढळून आल्यास तिथेच नोटीस बजावून अशी बांधकामे रोखावीत किंवा बांधकामाचे क्षेत्र सील करण्याची कारवाई करावी, असे पालिकेने नियमावलीत म्हटले आहे.  मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी घातली आहे. या सोबतच नवी नियमावली देखील जारी केली असून याचे उल्लंघन केल्यास आता घेत कारवाई केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६ हजार बांधकाम प्रकल्पांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.  देवनार आणि कांजूरमार्ग येथील दोन लँडफिलमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करून यातील धोकादायक आणि प्रदूषणाला हानिकारक ठरणारा कचरा वेगळा करण्यात येणार आहे. या साठी लवकरच प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.विशेषतः कचरा डंपिंग ग्राउंड आणि कचरा जाळण्याची संभाव्य ठिकानावर कचरा उघड्यावर जाळण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

शहर स्वच्छ कृती आराखड्याच्या माध्यमातून नवी मुंबई शहर स्वच्छ होतेय.. 

 केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमाची नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबई शहर स्वच्छ हवा कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्या अनुषंगाने कृतीशील पावले उचलण्यात आहेत. त्याकरिता विविध उपक्रम राबविले जात असून पर्यावरणपूरक उपाययोजनांव्दारे हवा गुणवत्तावाढीसाठी प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छ हवा कृती आराखडयाच्या अनुषंगाने हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते नियमीतपणे धुणे, त्यासाठी पुनर्प्रक्रियाकृत पाणी वापरुन पिण्याच्या पाण्याची बचत करणे, मुख्य रहदारीच्या चौकातील कारंजे नियमीत सुरु ठेवणे व त्यातही पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करणे, फ्लेमिंगो पाँईंट्सचे संवर्धन करणे. धुलीकण प्रदूषण करणा-या आरएमसी प्लान्टवर कारवाई करणे अशा विविध प्रकारे वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

या पुढील कालावधीत स्वच्छ हवा कृती आराखड्यांतर्गत जास्त प्रमाणात धूळ निर्माण होते अशा ठिकाणी वॉटर स्प्रिंकलर सिस्टिमचा वापर करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात यावीत असे निश्चित करण्यात आले. एमआयडीसी क्षेत्रातील सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी धूळ प्रतिबंधक उपायोजना राबविणेबाबत संबंधितांना एमआयडीसी मार्फत सूचना देण्यात याव्यात असे निश्चित करण्यात आले. नवी मुंबई विमानतळाचे काम गतीमानतेने सुरु असुन त्याठिकाणी मोठया प्रमाणात निर्माण होणा-या धूळीचा प्रतिकुल परिणाम व अतिरिक्त ताण शहरातील हवेवर पडत असून याबाबत सिडको प्रशासनाशी उच्च पातळीवर चर्चा करण्यात यावी व हवा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक  त्या उपाययोजना प्रभावी रितीने व्यापक स्वरुपात राबविण्याचे काम त्यांच्याकडून करवून घ्यावे असे ठरविण्यात आले. महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या इमारती व इतर बांधकामाच्या ठिकाणीही प्रदूषण प्रतिबंधक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्यात याव्यात याकडे विभाग कार्यालय स्तरावरुन बारकाईने  लक्ष देण्यात येत आहे.  

नवी मुंबई महानगरपालिकेने दोन धूळ आटोक्यात आणणारी वाहने खरेदी केली आहेत जी धुळीच्या कणांचा बंदोबस्त करण्यासाठी पाण्याचे सूक्ष्म धुके म्हणून विखुरतील. नवी मुंबई महापालिकेची लवकरच आणखी दोन वाहने जोडण्याची योजना आहे, ज्याचा ताफा दुसऱ्या टप्प्यात सहा पर्यंत वाढेल. विविध भागात धूळ रोखणे आणि कमी करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित 

वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालल्याने हवा शुद्ध होण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पुढाकार घेतला आहे. शहराच्या विविध भागांत हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा एअर बिन प्युरिफायर बसविण्यात येणार आहे. त्यानुसार वाकडमधील कस्पटे वस्तीमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविली आहे.

महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकात जानेवारी महिन्यात शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविण्यासाठी कृत्रिम फुफ्फुसे बसविली होती. ती महिनाभरातच काळी पडली होती. त्यातून शहराची गुणवत्ता किती ढासळत आहे, हे सिद्ध झाले होते. हवेमध्ये प्रदूषक कणांची पातळी वाढली. त्यामुळे महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने शहरातील महत्त्वाच्या चौकात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यात आली  आहे. त्यानुसार वाकडमधील कस्पटे वस्तीमध्ये यंत्रणा बसविली असून लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

तसेच महापालिकेतर्फे रस्त्यांसाठी ८ विद्युत स्वीपिंग मशीन खरेदी करण्यात येणार आहेत. जेणेकरून रस्त्यावर साचणारी धुळे आटोक्यात आणणे शक्य होईल. तसेच महापालिकेतर्फे रस्ते धुण्यासाठी दोन वाहने खरेदी करण्यात आली आहेत. 

विशेष म्हणजे जास्त प्रमाणात वाहतूककोंडी होणाऱ्या चौकात महापालिकेतर्फे १३ कारंजे बसवण्यात येणार आहेत.

हवेचा दर्जा ढासळलेला असताना नागरिकांनी काय काळजी घ्यावी ?

प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार वाढत आहेत. श्वसन विकारात दमा, क्षयरोग, न्युमोनिया, फुप्फुसे कर्करोग, श्वसन नलिकेला सूज, दम लागणे असे विकार, तर त्वचेची अ‍ॅलर्जी, त्वचा कोरडी राहणे, फाटणे, लाल होणे, खाज येणे अशा समस्यांचे प्रमाण वाढते आहे. ताप येणे, डोळे दुखणे, घसा दुखणे आदी आजार उद्भवत आहेत. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंड पेये प्राशन, तेलकट खाणे वर्ज्य करावे. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी. बाहेर पडताना मुखपट्टी वापरावी.

वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालल्याने हवा शुद्ध होण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पुढाकार घेतला आहे. शहराच्या विविध भागांत हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा एअर बिन प्युरिफायर बसविण्यात येणार आहे. त्यानुसार वाकडमधील कस्पटे वस्तीमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविली आहे.

महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकात जानेवारी महिन्यात शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविण्यासाठी कृत्रिम फुफ्फुसे बसविली होती. ती महिनाभरातच काळी पडली होती. त्यातून शहराची गुणवत्ता किती ढासळत आहे, हे सिद्ध झाले होते. हवेमध्ये प्रदूषक कणांची पातळी वाढली. त्यामुळे महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने शहरातील महत्त्वाच्या चौकात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यात आली  आहे. त्यानुसार वाकडमधील कस्पटे वस्तीमध्ये यंत्रणा बसविली असून लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

तसेच महापालिकेतर्फे रस्त्यांसाठी ८ विद्युत स्वीपिंग मशीन खरेदी करण्यात येणार आहेत. जेणेकरून रस्त्यावर साचणारी धुळे आटोक्यात आणणे शक्य होईल. तसेच महापालिकेतर्फे रस्ते धुण्यासाठी दोन वाहने खरेदी करण्यात आली आहेत. 

विशेष म्हणजे जास्त प्रमाणात वाहतूककोंडी होणाऱ्या चौकात महापालिकेतर्फे १३ कारंजे बसवण्यात येणार आहेत.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Wednesday, October 25, 2023

कल्याण शहर सुंदर होणार ! पर्यावरणपूरक उपक्रम आणि सौंदर्यीकरण

हाराष्ट्रातील  ठाणे जिल्ह्यात एकूण सहा महानगरपालिका आहेत. ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, .भिवंडी निजामपूर महानगरपालिका,  उल्हासनगर महानगरपालिका आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका.  आज आपण कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेविषयी माहीत करून घेणार आहोत. ऑक्टोबर महिन्यात या महापालिकेने वर्धापन दिन साजरा केला.  'क' वर्गाचे प्रतिनिधित्त्व  करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने  शहर-सौंदर्यीकरणाचे विविध पर्यावरण पूरक उपक्रम राबविले आहेत.  या उपक्रमांनी पर्यावरणाचे संतुलनही राखले गेले आहे.  तसेच कल्याण-डोंबिवली शहराची दाखल  राज्यपातळीवर घेण्यात आली आहे.  

१) रस्ता दुभाजक सुशोभिकरण 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रस्ता रुंदीकरण झालेल्या सुमारे ४० कि.मी. लांबीच्या विविध रस्त्यांमधील दुभाजकांचे शोभिवंत झाडे लागवड करुन सुशोभिकरण करण्यात आले. सदर काम करतांना शहरातील विकासक, सामाजिक संस्था यांना विश्वासात घेऊन सुशोभिकरणाचे काम केले आहे.

त्याच बारोबर संबंधित विकासक पुढील ५ वर्षे सुशोभिकरण केलेल्या दुभाजकांची देखभाल राखणार आहेत. त्याचबरोबर सर्व रुंदिकरण झालेल्या रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले असून सर्व रस्ते आता हिरवेगार झालेले आहेत.

२) चौक सुशोभिकरण 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांवर चौक, वाहतुक बेटे यांची उभारणी करण्यात आली आहे. शहराच्या सौंदर्यीकरणात वाढ होण्यासाठी विविध सामाजिक संस्था, दवाखाने, विकासक, बँका यांना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहभागातुन सुमारे २६

चौकांचे सुशोभिकरण व एलईडी इल्युमीनिटेड कर्व्ह स्टोन बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडलेली आहे. त्याच बरोबर वाहतुक सुरक्षितेच्या दृष्टीने वाहन चालकांना दिशा दर्शक ठरले आहे. तसेच चौकातील फसाड लाईटमुळे शहर खुलुन दिसत आहे.

३) तिरंगा लाईट 

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवाचे औचित्य साधुन कल्याण पश्चिम, दुर्गाडी ते भवानी चौक (बिर्ला कॉलेज) हा ४ कि.मी. लांबीचा व सुचक नाका ते श्रीराम चौक, पुना लिंक रोड हा ४ कि.मी.लांबीच्या रस्त्याचे दुभाजकांमधील पथदिवे पोलवर आकर्षक तिरंगा रोषणाई कायमस्वरुपी करण्यात अलीआहे. त्यामाळे हे रस्ते आकर्षणाचे केंद्र बिंदु ठरले आहेत.

४) जैव विविधता उद्यान, नागरी वनिकरण व उद्याने 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आंबिवली येथे सुमारे ५० एकर क्षेत्रावर महानगरपालिकेने एमएमआरडीए व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जैव विविधता उद्यान उभे केले आहे. या ठिकाणी जैव विविधता वाढील चालना मिळाली आहे. शहरातील शाळा व महाविद्यालये यांच्यासाठी अभ्यासाचे केंद्र ठरले आहे. या जैव विविधता उद्यानाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. तसेच कल्याण पश्चिम उंबर्डे येथील सुमारे १० एकर जागेवर शहर वनिकरण अंतर्गत अमृतवन उभारले आहे. या वनिकरणातुन सायकल ट्रॅक निर्माण केला असल्यामुळे शहरातील नागरीकांना पर्यावरण पुरक सायकल सफारी करता येते. महानगरपालिकेची ६५ लहान व मोठी उद्याने असून नागरीकांना या सर्व उद्यानामध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

५) तलाव सुशोभिकरण 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ३५ तलाव आहेत. त्यापैकी शेनाळे तलाव व टिटवाळा गणेश तलाव यांचे सुशोभिकरण करण्यात आले आहेत. तसेच उंबर्डे तलाव व निळजे सुशोभिकरणाचा प्रस्ताव शासन दरबारी मंजूर झाला आहे. तसेच इतर तलावांचेसुध्दा सुशोभिकरण करण्याचे प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

६) वृक्ष संख्या

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील १० ते १५ वर्षात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड झालेली आहे. सदर वृक्ष गणना आवश्यक असल्यामुळे चालु वर्षी अत्याधुनीक टेक्नॉलॉजी वापरुन वृक्ष गणनेचे काम सुरु आहे. शहरात सुमारे ६ लक्ष झाडे असतील असा प्राथमीक अंदाज आहे.

७) एलईडी पथदिवे 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेले जुने सोडीयम पथदिवे काढुन नविन ग्रीन एनर्जीयुक्त एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३८,५०६ पथदिवे असून त्यापैकी ३५,९५२ एलईडी पथदिवे बसविण्यात आल्यामुळे उर्जा बचत झाली असून पर्यावरयुक्त ग्रीन एनर्जीला महापालिकेने प्रोत्साहन दिले आहे.

८) सौर उर्जा:-

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नविन इमारतींना सौर उर्जा सयंत्र बसविणे बंधनकारक केले असून सन २००७ ते २०२१ पर्यंत एकूण १८३२ इमारतींवर १ कोटी १० लक्ष क्षमतेचे सौर उष्ण सौर सयंत्रे बसविण्यात आली असून त्यामुळे प्रती वर्ष १८ कोटी २० युनीटची बचत होत आहे. सन २०२१ पासून महानगरपालिकेने नविन इमातींना सोलर रुपटॉप सौर उर्जा निर्मिती करणारी सयंत्रे बसविणे बंधनकारक केले असून आतापर्यंत ९९ इमारतींवर १.५४ मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जा सयंत्रे बसविण्यात आली असून त्यामुळे प्रती वर्षी २२ लक्ष ५४ हजार विज युनिटची निर्मिती होत आहे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या धारणानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सौर उर्जा धोरणास चालना दिलेली आहे.

९) आकर्षक, कलात्मक भिंतीचित्रे 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहराच्या सौदर्यीकरणात भर घालण्याच्या दृष्टीने शहरातील\ भिंतींवर थीम बेस पध्दतीने स्पोर्ट्स थीम, नेचर थीम, जंगल थीम, फेस्टीवल थीम आधारीत जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन शहरातील भिंतींवर आकर्षक, कलात्मक भिंतीचित्रे साकारली आहेत.

शहर सौदर्यीकरणात अशा विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवुन शहराच्या सौदर्यीकरणात मोठ्या प्रमाणावर भर पडली आहे. तसेच पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने नागरिकांमध्ये जागरुकता वाढीस लागली आहे. हे उपक्रम करतांना शहरातील नागरीक डोळ्या समोर ठेऊन लोक सहभागातुन हे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे आपसुकच शहरातील नागरीकांचे शहराबद्दल पूर्वी असलेले मत बदलेले असून त्यांच्या मनामध्ये शहराबद्दल आस्था निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील सन २०२२-२३ मध्ये  घेतलेल्या शहर सौदर्यीकरण स्पर्धेमध्ये "क" वर्ग महानगरपालिका गटामध्ये शासनाचे दुसऱ्या क्रमांचे  १० कोटी  रक्कमचे बक्षीस महानगरपालिकेला प्राप्त झाले आहेत.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Sunday, October 22, 2023

ठाणे शहर बदलतंय

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमाअंतर्गत शहरातील नऊशेपैकी सातशे सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीची कामे सुरू असून त्याचबरोबर राज्य शासनाकडून मिळालेल्या ५ कोटी ४५ लाखांच्या निधीतून ठाणे महापालिका शहरातील प्रमुख रस्त्यांसह झोपडपट्टी भागांमध्ये कंटेनर शौचालयांची उभारणी करीत आहे. एकूण ३० ठिकाणी सुरू असलेली ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. येत्या काही महिन्यांत या शौचालयांची सुविधा नागरिकांना उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.

शहरातील नऊशेपैकी सातशे सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीची कामे सुरू असून या कामांसाठी राज्य सरकारने पालिकेला निधी दिला आहे. ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमाअंतर्गत शहरातील रस्त्यांचे नुतनीकरण, सुशोभिकरण तसेच इतर प्रकल्पांची कामे ठाणे महापालिकेने हाती घेतली असून त्याचबरोबर शहरातील स्वच्छतेवरही विशेष भर देण्यात येत आहे. असे असले तरी शहरातील प्रमुख रस्ते आणि झोपडपट्ट्यांमधील काही भागांमध्ये शौचालयांची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे अशा ठिकाणी शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. या शौचालयांच्या ठिकाणी पाण्याची टाकी बसविण्यात आली असून त्याद्वारे शौचालयांमध्ये सतत पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर ज्याठिकाणी मलवाहिन्यांना कंटेनर शौचालयांची मलवाहिनी जोडणे शक्य आहे, त्याठिकाणी त्या जोडण्याचे काम सुरू आहे. तर ज्याठिकाणी मलवाहिनी जोडणे शक्य नाही, त्याठिकाणी मलटाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानांतर्गत खड्डेमुक्त शहर, स्वच्छता, सौंदर्यीकरण, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता ही महत्वाकांक्षी ठाण्यात कामे सुरू आहेत. या कामांसाठी दोन ते सहा महिन्यांचा मर्यादित कालावधी ठेवण्यात आला आहे. शहरात सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा दिवसनिहाय आढावा घेणे अपेक्षित असून त्यासाठी वॉर रुम तयार केली जातआहे.  ठाणे शहरात खड्डेमुक्त रस्ते, शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता, स्वच्छतागृहांची सफाई यासह विविध नागरी कामे हाती घेण्यात आली आहे. या कामांचा आढावा वॉर रुमच्या माध्मयातून घेतला जाणार आहे. या कामांची छोट्या बाबींमध्ये विभागणी करुन जाणार असून त्यांची कालमर्यादा निश्चित असल्याने दैनंदिन कामाची प्रगती पाहिली जाणार आहे,

ठाणे शहरातील १५ तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरण केले जाणार आहे. तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील तलावांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी विविध कामे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येतात. याच मालिकेत, केंद्र शासनाच्या माध्यमातून अमृत-२ योजनेतंर्गत एकूण १५ तलावांच्या संवर्धन आणि या कामांच्या निविदा अंतिम करून कार्यादेश देण्यात आले आहेत. तसेच काही तलावांच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे.  शहरात सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाचे दृश्यरुप ठाणेकरांना अनुभवयास मिळत आहे. त्याप्रमाणेच, तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या १५ तलावांमध्ये तुर्फेपाडा, खारीगाव, हरियाली, शिवाजीनगर-कळवा, कौसा, कोलशेत, दातिवली, देसाई, ब्रह्माळा, आंबे-घोसाळे, कचराळी, रायलादेवी, कमल, खिडकाळी आणि जोगिला या तलावांचा समावेश आहे. यासाठी एकूण ५३ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. त्यापैकी २५ टक्के रक्कम टक्के केंद्र शासन, २५ टक्के राज्य शासन देणार आहे. तर, उर्वरित ५० टक्के निधी महापालिकेचा आहे. तलावाच्या सभोवती नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस, ठिकठिकाणी सुका कचरा आणि ओला कचऱ्यासाठी वेगवेगळे डस्टबीन, सुरक्षा रक्षकासाठी केबीन, निर्माल्य कलश, फायबर ग्लास बोट आणि आवश्यकतेनुसार सूचना फलक लावले जातील. 

यानुसार ठाणे शहराचा कायापालट होत असून टप्प्याटप्प्याने ठाणे शहर बदलतंय.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Thursday, October 19, 2023

गाव ते महानगर आणि उद्योगनगरी ते क्रीडानगरी... पिंपरी-चिंचवड शहराची स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल

शिक्षणाचे माहेरघर पुणे शहर हे पूर्वीपासून विकासाचे केंद्र होते. पुण्या शेजारील  शेजारील पिंपरी-चिंचवडमध्ये दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आग्रहाने 'टेल्को' प्रकल्प आणला. पाठोपाठ अनेक देशी-विदेशी उद्योग, त्यांच्यावर अवलंबून हजारो लघुउद्योगांमुळे येथे उद्योगसंस्कृती बहरली आणि हजारो हातांना रोजगार मिळाला. या कामगारांची परिसरातच निवासाची व्यवस्था करण्यासाठी १९७२ मध्ये पिंपरी-चिंचवड  प्राधिकरणाची स्थापना झाली. या भागात ४२ निवासी पेठा, चार मध्यवर्ती व्यापार केंद्रे अशा सुविधा विकसित करण्याचे नियोजन होते. आतापर्यंत यापैकी ३२ निवासी पेठा विकसित झाल्या असून, सुमारे ११ हजार घरे उभी राहिली आहेत. याचे  श्रेय पिंपरी-चिंचवड प्राधिकरण आणि महानगर पालिकेला जाते. 

असे मध्येच पिंपरी-चिंचवड महापालिकेविषयी लिहिण्याचे कारण काय? तर  गाव ते महानगर आणि उद्योगनगरी ते क्रीडानगरी अशी ओळख असणारे पिंपरी-चिंचवड शहर ५३  वर्षांचे झाले आहे. तर महानगरपालिकेच्या स्थापनेला ११ ऑक्टोबर २०२३ ला ४१  वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या बदलत्या स्वरूपाविषयी माहिती असणे गरजेचे आहे. 

पुणे शहरालगत वाहतूक दृष्ट्या सोयींची आणि मोकळी माळरानाची जागेची उपलब्धता पिंपरी-चिंचवड भागात होती.  परिणामी  या परिसराचा  औद्योगिक विकास होऊ लागला. त्यामुळे  कामगार, तंत्रज्ञ व इतर सेवा देणारे लोक या परिसरात येऊ लागले. त्यांच्या वास्तव्यासाठी ,परिसरात व्यवस्था करण्यासाठी, या भागातल्या गावागावात चाळींची, घरांची निर्मिती झाली. पण नागरी सुविधा पुरवणे इथल्या ग्रामपंचायतींना शक्य नव्हते, म्हणून मग इथल्या पिंपरी, चिंचवड ,आकुर्डी ,भोसरी या गावातील ग्रामपंचायती विसर्जित करून ४ मार्च १९७० रोजी पिंपरी चिंचवड नवनगर पालिका अस्तित्वात आली.

नगरपालिकेच्या स्थापनेनंतर अवघ्या दोन वर्षात १९७२ मध्ये नवनगर विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली. सुनियोजित शहराच्या उभारणीसाठी ४०  पेठांचे नियोजन होते. त्यापैकी बहुतांशी पेठा विकसित केल्या आहेत. त्यातील टुमदार ,सुंदर घरे, नियोजनबद्ध वसाहत, शहराच्या सौंदर्यात भर घालणारी आहे. तसेच शहराच्या जडणघडणीत एमआयडीसीचेही योगदान फार मोठे आहे.

नगरपालिका अस्तित्वात आली त्यावेळी ३८  चौरस किलोमीटर इतके क्षेत्र होते. त्यानंतर १९८२  मध्ये हद्दवाढ होऊन महापालिका झाली. १९९७ मध्ये पुन्हा एकदा हद्दवाढ झाली. यावेळी शहराचे क्षेत्रफळ १७१  चौरस किलोमीटर इतके झाले. शहराच्या विकासासाठी भरपूर मोठे क्षेत्र उपलब्ध झाले.  तर 

पिंपरी-चिंचवडच्या छोट्या छोट्या खेड्यांचे रुपांतर उपनगरांत झाले आहे.  उपनगरांचे रूपांतर उद्योगनगरीत झाले. उद्योगनगरी महानगर म्हणून नावारुपास आली आहे.  आणि आता तर महासागराची  वाटचाल आता स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी बरोबरच क्रीडानगरीच्या दिशेने सुरू आहे. त्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा  महत्त्वाचा वाटा आहे.

सध्या पिंपरी-चिंचवड शहर क्रीडानगरी म्हणून नावारूपास आले आहे. पूर्वीचे गावागावांत असलेले पहेलवानांचे आखाडे, तालमी जीवंत ठेवत क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, हॉलिबॉल, फुटबॉल, सायकलींगसह अन्य मैदानी खेळांसाठी क्रीडांगणे उभारली आहेत. यासाठी महापालिकेसह खाजगी संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. 

महापालिकेच्या माध्यमातून थेरगाव येथे क्रिकेटचे मैदान उभारले आहे. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून त्याची देखभाल केली जाते. त्याला पीसीएमसीज् व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी नावाने ओळखले जाते. इनडोअर आणि आऊटडोअर दोन्ही प्रकारची मैदाने येथे आहेत. अकॅडमीतील विद्यार्थ्यांना भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर स्वतः मार्गदर्शन करतात. नुकत्याच झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईच्या संघाकडून खेळलेला सांगवीतील ऋतुराज गायकवाड हा अकॅडमीचाच विद्यार्थी आहे. वेगवेगळ्या वयोगटानुसार अकॅडमीतर्फे ‘व्हेरॉक चषक’ स्पर्धा आयोजित करून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे. पीसीएमसीज् व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये मुलींनाही क्रीकेटचे धडे दिले जात आहेत. नुकत्याच गुजरातमध्ये झालेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत महाराष्ट्राचा मलींचा संघ खेळला.   गहुंजेतील क्रिकेट स्टेडियम, म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडानगरी, पॉलिग्रास हॉकी मैदान, पिंपरी-चिंचवड महापालिकेची नेहरूनगर इथली क्रीडा नगरी  क्रीडाप्रबोधिनी   उत्तमोत्तम खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनासारख्या विविध लोकल्याणकारी योजना पिंपरी-चिंचवडमध्ये राबविण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेत बोर्‍हाडेवाडी व चर्‍होली येथील गृहप्रकल्पांतील सदनिका तयार झाल्या आहेत. बोर्‍हाडेवाडीचा प्रकल्प 100 टक्के तयार असून, चर्‍होलीतील 7 इमारती तयार आहेत.  सदनिकांची चावी भारताचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र  मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना १ ऑगस्ट २०२३ ला दिल्या.  शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ देण्यासाठी मनपाचे संबंधित अधिकारी अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करीत आहेत. शहराचा सर्वांगीण विकासासाठी विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून राज्य शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शहरातील विकास कामे करताना नगर विकासाच्या नियमावलीप्रमाणे कामे होत आहेत. विकासकामे पूर्ण करताना त्यातील त्रुटी कमी करुन ती दर्जेदार करण्यावर भर दिला जात आहे. 

उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन झटत आहे.  राज्य शासनाने नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू  करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्यासाठी विशेषतः अतिदक्षता विभागात अनुभवी डॉक्टरांची नेमणूक करा. येत्या काळात शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्यावर विचार मंथन सुरू आहे. 

पिंपरी-चिंचवडमहानगर पालिकच्या शाळांचा  विद्यार्थ्यांना दर्जेदार पद्धतीचे शिक्षण मिळण्यासाठी सुसज्ज इमारत, स्वच्छतागृह, ई-क्लासरुम आदी पायाभूत सुविधा उभारणी भर राहिला आहे. मनपा प्राथमिक शाळेत ई-क्लासरुम करताना वायफाय, एचडी कॅमेरे, एलईडी डिस्प्ले आदी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मनपा सुरुवात करणार आहे. आयटीआय’मध्ये रोजगार निमिर्तीच्या अनुषंगाने महापालिकेच्या शाळांमधून अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला जाणारा आहे. नवीन शाळेची इमारत करताना त्यामध्ये मराठी माध्यमासोबत गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध होण्याच्यादृष्टीने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासन विशेष प्रयत्न करणार आहे. 

प्रदूषणमुक्त आणि झोपडपट्टी मुक्त शहर करण्यासाठी  पिंपरी-चिंचवड  महापालिका प्रशासन विशेष प्रयत्नशील आहे.  प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक धोरणाप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिल जात आहे.  इलेकट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारले जात आहेत. कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्यापासून वीज निमिर्ती तसेच खत निर्मिती प्रकल्प उभारले जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.  याचे चालते बोलते उदाहरण आहे, मोशी खत निर्मिती प्रकल्प. 

मोशी येथील कचरा डेपोमध्ये वेस्टू टू एनर्जी हा प्रकल्प उभारला आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची चाचणी घेण्यात आली आहे. त्यात १.०७  मेगावॅट वीज तयार केली आहे. हा प्रकल्प डीबीओटी तत्वावर २०८ कोटी३६  लाख रुपये खर्च करून उभारला आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू केली आहे. डेपोत जमा झालेल्या ७००  टन सुक्या कचर्‍यापासून दररोज १४ मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे. ती वीज प्रतियुनिट ५ रुपये दराने पालिका २० वर्षे विकत घेणार आहे. ही वीज महापालिका निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र, मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र या ठिकाणी वापरणार आहे. त्यामुळे पालिकेच्या वीजबिलात सुमारे ३५ ते ४० टक्के बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, अद्याप तयार होणारी वीज वहनासाठी महावितरणांच्या यंत्रणेसोबत सुरू असेलली प्रक्रिया अद्याप झालेली नाही. या प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन आहे. तसेच, ८१ एकर जागेतील कचरा डेपोत गेल्या २५ वर्षांत जमा झालेल्या कचर्‍याचे मोठे- मोठे डोंगर आहेत. ते काढून त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. या बायोमायनिंगच्या पहिल्या टप्प्यात १४  एकर जागेतील कचरा काढण्याचे काम मार्च २०२१  ला सुरू झाले आहे. त्यासाठी ४२ कोटी खर्च करण्यात येत आहे. दुसर्‍या टप्प्यातील कामाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज, कोथरूड ते रामवाडी तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर अशा एकूण 54.58 किलोमीटर मार्गांवर मेट्रो ट्रेन धावण्यास सुरुवात झाली आहे.  याशिवाय स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आता पिंपरी-चिंचवड महापालिकेने  शहरातील मेट्रोचे जाळे आणखी विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसंख्येच्या प्रमाणात त्या त्या भागात स्मशानभूमी आणि दफनभूमी निर्माण करण्यावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रयत्नशील आहे. शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. बेघर नागरिकांना पक्के घरे देण्याची कार्यवाहीवर महानगर पालिकेची संबंधीय अधिकाऱयांशी बोलणी सुरू आहेत. 

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा, रस्ते विकास, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पक्की घरे, वाहतूक नियंत्रण आदी सुविधा मनपामार्फत करण्यावर भर देण्यात येत आहे. वाढती लोकसंख्या विचारात घेऊन मोशी येथे नवीन रुग्णालय प्रस्तावित आहे. महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने महिला बचतगटांसाठी मॉल उभारण्यात येणार आहे. दिव्यांग नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांना घरपोच दाखला देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने उद्याने विकसित करण्यावर भर देण्यात आहे, 

पवना, इंद्रायणी व मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, पवना बंद पाईपलाईन, भामा आसखेड प्रकल्प, २४ x ७ पाणी पुरवठा योजना, पाण्याची साठवण क्षमता, स्मार्ट शहर प्रकल्प, पुणे-निगडी विस्तारित मेट्रो मार्ग, अंतर्गत रिंगरोड, पुनवळा येथील कचरा डेपो, नाशिक फाटा-चाकण फाटा, आळंदी ते लोहगाव रस्ता, बायोगॅस आणि सौरऊर्जा प्रकल्प, कचरा प्रश्न, अण्णासाहेब मगर क्रीडांगण, कर संकलन, जलशुद्धीकरण प्रकल्प, मैला शुद्धीकरण प्रकल्प, मनपाची नवीन प्रशासकीय इमारत असे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणारी विविध प्रकल्प जसजसे सुरू होतील,  \तसतसा शहराच्या विकासात कमालीचा  बदल  होईल. म्हणजेच शहराच्या विकासाचा आलेख आजूनवृ द्धिंगत होईल.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Friday, October 13, 2023

महापालिकांची हरित उत्सव प्रेरणा...

माझी  वसुंधरा अभियान अंतर्गत प्रत्येक उत्सव हा  कसा ;हरित उस्तव' होईल  यासाठी  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विशेष प्रयत्नशील आहेत.  त्यासाठी विविध प्रकारे जनजागृतीचे केली जात आहे. माझी वसुंधरा अभियान ४. 0” अंतर्गत गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात जमा होणाऱ्या निर्माल्यातून खतनिर्मिती करण्याकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा विशेष कल आहे. 

मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून यंदाही विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. दहा दिवसांच्या कालावधीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली होती.  मुंबईत गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या कालावधीत पार पडलेल्या गणेशोत्सवात६९  नैसर्गिक आणि २००  कृत्रिम तलावांच्या ठिकाणी हार, फुले, दुर्वा आदी मिळून एकूण ५०० मेट्रिक टन इतके निर्माल्य जमा झाले आहे. महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये असणा-या सेंद्रीय खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हे निर्माल्य हलविण्यात आले आहे. मुंबईतील २४७ नैसर्गिक आणि कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मिळून३७१ निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. तसेच ९८ वाहनांचा वापर करून हे निर्माल्य खतनिर्मितीसाठी पाठवण्यात आले. निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेस सुरूवातही झाली आहे. पुढील साधारपणे एका महिन्याच्या कालावधीत ह्या सर्व निर्माल्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होईल. तयार होणारे हे सेंद्रीय खत महानगरपालिका उद्यानांमध्ये खत म्हणून वापरण्यात येणार आहे, 

गेली १२ वर्षे  ठाणे महापालिका  गणेशोत्सव काळातील निर्माल्यव्यवस्थापन करीत आहे. यंदा दीड दिवसाच्या गणपतीत १० टनांहून अधिक निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून ते सेंद्रिय खत निर्मितीस पाठविले गेला तेच.  तसेच निर्माल्यातील अविघटनशील घटकांचे वर्गीकरण करून ते पुनर्प्रक्रियेसाठी वेगळे काढले आहेत, या वर्षी प्लास्टिक, थर्मोकोल अशा अविघटनशील घटकांचे निर्माल्यातील प्रमाण   लक्षणीयरित्या कमी झाले असून केवळ ४ टक्केच म्हणजे ४०० किलोच अजैविक कचरा आढळला. गेल्या १२ वर्षांच्या सातत्यपूर्ण जनजागृती, कृतीरूप कार्यक्रमांमुळे हे शक्य झाले आहे. दीड दिवसांच्या गणपतीसोबत पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणपतीच्या विजर्सनाच्यावेळीही ३०  निर्माल्य संकलित करण्यात आले. 

वसई-विरार शहर महापालिकेतर्फे 'इको गणेशा २०२३ ' या संकल्पनेअंतर्गत पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले . त्याअनुषंगाने विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले.  गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, यंदाच्या गणेशोत्सवातही निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. यासाठी आठ महिला बचत गटांना काम देण्यात आले आहे.

वसई-विरार शहरात विसर्जनादरम्यान मोठ्या प्रमाणात हारफुले, केळीचे खांब आदींचे निर्माल्य तयार होत असते. हे निर्माल्य तलाव, समुद्र, नदी, खाड्यांमध्ये टाकून दिले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी या निर्माल्याचे संकलन करून खतनिर्मिती करण्याची संकल्पना आयुक्त अनिलकुमार पवार यांनी मांडली होती. त्यानुसार शहरात ५८ ठिकाणी १०५ कृत्रिम तलाव उभारण्यात आले. या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य संकलित केले गेले आहे. . या निर्माल्यापासून महिला बचत गटांतर्फे नैसर्गिकरित्या खतनिर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा आठ महिला बचत गटांमार्फत हे काम सुरू करण्यात आले आहे. प्रभाग समिती 'ए' (बोळींज) आणि प्रभाग समिती 'सी' (चंदनसार) यामध्ये निर्माल्यापासून खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मनू तलाव नानभाट, शंकर मंदिर तलाव, वटार भोंगाळे तलाव, साई यशवंती मंदिर, रानपाडा तलाव, राम मंदिर, रानाळे तलाव मनवेलपाडा, बर्फेश्वर तलाव अशा ठिकाणी खतनिर्मिती केली जाणार आहे. 

२०२२ मध्ये वसई-विरार महापालिकेने बचत गटांना खतनिर्मितीसाठी दिले होते. यामध्ये उमादेवी महिला बचत गट, केजीएन महिला बचत गट, नजराणा महिला बचत गट, एकविरा बचत गट अशा चार गटांचा सामावेश होता. या निर्माल्यामधील अनावश्यक घटक बाजूला करून उरलेल्या हारफुलांवर प्रक्रिया करून तीन हजार ४०० किलो खताची निर्मिती केली. त्यामुळे यंदाचे आठ महिला बचत गट निर्माल्यापासून किती किलो खताची निर्मिती करतात. याकडे लक्ष लागले आहे. 

उल्हासनगर महापालिकेने गणेशोत्सवांदरम्यान  ओला आणि सुका अशा निर्माल्याचे वर्गीकरण करून ७ मेट्रिक टन निर्माल्यावर हिराघाट येथील बोट क्लबमध्ये कम्पोस्टिंग करण्यात येत आहे. त्यातून ६ महिन्यांत सेंद्रिय खताची निर्मिती होणार आहे.निर्माल्यातून तयार होणाऱ्या खताचा वापर शहरामधील सर्व उद्याने, प्रभाग समिती कार्यालय आवारातील झाडे आणि रस्त्याच्या दुभाजकामधील झाडांसाठी केला जाणार आहे. जेणेंकरून  या झाडांच्या मुळांना बळकटी मिळणार असून ते जास्त प्रमाणात टिकाऊ होतील.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेनेही निर्माल्य संकल मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे दिवसाला २१ हजार किलो निर्माल्य जमा झाले आहे. या निर्माल्यावर खतनिर्मितीस सुरुवात केली आहे. 

गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रम राबविले होते. विसर्जन तलावांवर निर्माल्य संकलन व त्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली केली होती. दहा दिवसामध्ये ५८.७९ टन निर्माल्य संकलीत झाले असून त्यामधून तुर्भेमध्ये खतनिर्मीती केली

जाणार आहे.  निर्माल्यामध्ये फुले, दुर्वा, पुष्पमाळा, शमी, फळांच्या साली यांचा समावेश आहे. याशिवाय सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तीन ठिकाणी खतनिर्मीती करण्यात येणार आहे.

पुणे शहरात  गणेशोत्सव काळात  गणेशोत्सवाची सुरुवात ते  अनंतचतुर्दशीच्या काळात प्रतिदिवशी    १ लाख ३५ हजार ११२ किलो निर्माल्य घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचार्‍यांनी गोळा केले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून महापालिका त्यापासून खत निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. 

“माझी वसुंधरा अभियान ४. 0” अंतर्गत समस्त आळंदी पंचक्रोशीत यंदाचा गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी गणेश मुर्त्यांचे विसर्जन नदी पत्रात न करता नगरपरिषदेच्या मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती दान करावे या नगरपरिषदेच्या आवाहनास आळंदीकरांनी  उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यामुळे साधारणपणे १०,०००  गणेश मुर्त्या व ७ टन निर्माल्याचे संकलन आळंदी नगरपरिषदने केले आहे. 

नागपूर महानगर पालिकेने गणेशोत्सवात यंदा सार्वजनिक गणेश मंडळ तसेच घराघरातून पावणेदोनशे टन निर्माल्य गोळा केले. गेल्या  वर्षीच्या तुलनेत यंदा निर्माल्यात वाढ झाली असून भांडेवाडी येथे या निर्माल्यातून २५ ते ३० टन गांडूळ खत तयार करण्यात येणार असून त्याचा वापर मनपा व नासुप्रच्या उद्यानांमध्ये केला जाणार आहे.

यंदा नागपूर महापालिकेने दहाही झोनमधून निर्माल्य संकलनासाठी रथ तयार केला होता. याशिवाय कृत्रिम विसर्जन टॅंकजवळही निर्माल्य कलश बनविले होते. दहाही झोन तसेच कोराडी येथील विसर्जन टॅंकजवळील निर्माल्य कलशातून १७८.२ टन निर्माल्य गोळा करण्यात आले. निर्माल्य संकलनासाठी प्रत्येक झोनमध्ये पाच-पाच निर्माल्य रथाची व्यवस्था महापालिकेने केली होती. याशिवाय प्रत्येकी दोन वाहने अतिरिक्त ठेवण्यात आली होती.

सार्वजनिक गणेश मंडळाचे निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य रथची सुविधा नागपूर महापालिकेने केली होती.   याशिवाय नागरिकांनाही त्यांच्या घरातील निर्माल्य सार्वजनिक गणेश मंडळाच्या निर्माल्य कलशमध्ये टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर झोनमधून निर्माल्य संकलनाची जबाबदारी एजी एन्व्हायरो कंपनीकडे होती तर गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर व मंगळवारी झोनमधील निर्माल्य संकलनाची जबाबदारी बीव्हीजी या कंपनीकडे होती. 

अशाप्रकारे माझी वसुंधरा अभियान ४. 0”  राज्यभरातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था निर्माल्यापासून खात निर्मितीचे प्रकल्प राबवित आहेत; ते नक्कीच कौतुकास्पद आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Friday, September 22, 2023

महानगरपालिकांचे इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी प्रयत्न

ध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने गणेशोत्सव साजरा करण्यात व्यस्त आहे.  संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्याही इको  फ्रेंडली  पद्धतीने. माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला साजेसा गणेशोत्सव  महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था साजरा करीत आहेत. 

मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई- विरार, पालघर या शहरांमध्ये घरोघरी आणि मंडळांकडूनही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.  त्याचप्रमाणे  नाशिक, पुणे, चंद्रपूर, नागपूर या महानगरपालिका क्षेत्रांमध्येही गणेशोत्सव  धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. महापालिका या गणेशोत्सवाला इको फ्रेंडली टाच देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 

सर्वप्रथम मुंबई महानगर पालिकेने एक सोसायटी, एक गणपती ही संकल्पना राबविण्यास पुढाकार घेतला आहे. अशी संकल्पना राबविणाऱ्या सोसायटींना आकर्षक बक्षीसे जाहीर केली आहेत. 

यंदा शाडू माती आणि पर्यावरणपूरक साहित्यांपासून गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुंबई  पालिकेने शाडूची माती निःशुल्क उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमांतर्गत मूर्तिकारांना यंदा ३६१ मेट्रिक टनांचे वाटण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

यातून ३० हजार मूर्ती बनविण्यात आल्या. यंदाच्या वर्षी प्रायोगिक स्तरावर शाडूची माती 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर देण्यातन आली असून, त्याच्या तब्बल ९ हजार २९ बॅगा वाटण्यात आल्या. निसर्गास हानी पोहोचू नये, तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने विविध उत्सव आयोजित केले जावेत यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. यंदाचागणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा म्हणून पालिकेच्या वतीनेमोफत शाडूच्या मातीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात भाविक आणि मूर्तिकारांना पालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. तसेच विसर्जनचा  रस्ताही  पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

सार्वजनिक, तसेच घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भाविकांना शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविण्याचे, तसेच घरगुती गणपती हे पर्यावरणस्नेही साहित्यांनी बनविण्याचे आवाहन मुंबई  पालिकेने यंदा अनेकदा केले आहे. त्याचबरोबर घरगुती गणपतीची उंची चार फुटांपर्यंत मर्यादित ठेवून कृत्रिम तलावांतच विसर्जन करण्याचेही आवाहन केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही पर्यावरणस्नेही उत्सवासाठी आवाहन करून मूर्तीची उंची शक्य तितकी कमी ठेवत चार फुटांपर्यंतच्या उंचीची मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याचे आवाहन केले आहे.

गणेशोत्सवात नागरिकांना उपलब्ध करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांवर महानगरपालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईमधील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या लक्षात घेऊन महानगरपालिकेने गणेशnविसर्जनासाठी कृत्रिम तलावांबरोबरच फिरत्या कृत्रिम तलावांची सुविधाही उपलब्ध यंदा २५० कृत्रिम तलाव उभारण्याची तयारी, १५ फिरते हौद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईमध्ये दोन लाखांहून अधिक घरगुती गणपती, तर सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. घरगुती  तसेच सार्वजनीक गणेशमूर्तीचे विसर्जन हे दीड, पाच, सात, नऊ आणि अनंत चतुदर्शी दिवशी मोठ्या प्रमाणावर होत असते. नागरिकांना घराजवळ गणेश विसर्जन करता यावे, वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच नैसर्गिक स्त्रोतांमधील प्रदूषण टळावे यासाठी ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करण्यात येते.  मुंबई महानगरपालिकेने यंदा सुमारे २५० कृत्रिम तलाव उभारण्याची तयारी केली आहे. आतापर्यंत २०० कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात महानगरपालिकेला यश आले आहे. उर्वरित कृत्रिम तलाव उभारण्याबाबत जागा आणि अन्य सुविधांची चाचपणी सुरू आहे. 

करोना काळात नागरिकांना गणेश विसर्जनासाठी नैसर्गिक विसर्जनस्थळी जावे लागू नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने 'विसर्जनस्थळ आपल्या दारी' ही संकल्पना अंमलात आणली होती. मोठ्या ट्रकवर पाण्याने भरलेला छोटेखानी हौद उपलब्ध करण्यात आला होता. हा ट्रक विभागात फिरत होता. इच्छुक भाविक या फिरत्या विसर्जन तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करीत होते. यंदा पुन्हा एकदा १५ फिरते कृत्रिम तलाव उपलब्ध करण्यात येणार आहेत. कृत्रिम तलावांची संख्या कमी असलेल्या भागात फिरत्या कृत्रिम तलावाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. परिणामी, इच्छुक भाविकांना आपल्या दारी येणाऱ्या

फिरत्या कृत्रिम तलावामध्ये गणेश विसर्जन करणे शक्य होणार आहे.

विसर्जन आपल्या दारी ही योजना चंद्रपूर  महानगरपालिकेने राबविण्यास सुरुवात केली आहे.  चंद्रपूर शहर महानगरपालिकेने विसर्जन कुंड  झोन क्रमांक, झोन क्रमांक २ आणि झोन क्रमांक ३ मध्ये उपलब्ध केले आहे. हे फिरते विसर्जन कुंड' वाहन शहरात फिरून नागरिकांच्या घराजवळून श्रीमूर्ती संकलित करतील व त्यांचे विधीवत विसर्जन  करण्यात येणार आहे.  या विसर्जन  कुंडाचे अधिकृत संपर्क क्रमांक चंद्रपूर महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध  केले आहेत. 

तलावांचे शहर अशी ओळख टिकविण्यासाठी ठाणे महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यात नवीन ४२ कृत्रिम तलावांची भर पडणार आहे. गृहसंकुले, नागरी वस्तीत जमिनीतखड्डा न खणता जमिनीवर म्हणजेच टाकीद्वारे हे कृत्रिम तलाव निर्माण केले करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना घराजवळ गणेश मूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. मढवी हाऊस, राम मारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभीनाका, जेल तलाव, देवदयानगर, शिवाई नगर, कामगार हॉस्पिटल, किसन नगर बस थांबा, मॉडेला चेक नाका, रिजन्सी हाईटस आझादनगर, लोढा लक्झेरिया या ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे. 

नवी मुंबई महानगर पालिकेने  बाप्पांच्या  विसर्जनासाठी १६३ ठिकाणी विसर्जनाची सोय केलेली आहे.  महानगरपालिकेने  प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवकांसह वैद्यकीय पथकांची सोय केली आहे.  महानगरपालिकेने शहरातील २२ मुख्य तलावांसोबत १४१ कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. महानगरपालिकेने प्रत्येक विसर्जन तलावांवर चोख व्यवस्था केली आहे. भाविकांची गैरसोय होणार नाही याची  काळजी नवी मुंबई महापालिकेने घेतली आहे.  त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेने  सर्व विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. सर्व ठिकाणी पुरेशी विद्युत व्यवस्था तसेच  जनरेटरची व्यवस्था केली आहे,. २२ मुख्य विसर्जन स्थळांवर वैद्यकीय पथके तैनात ठेवली आहेत.  मुख्य विसर्जन स्थळांवर तसेच व्यासपीठ तराफ्यांची व्यवस्थाही केलेली आहे.  ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था विसर्जन स्थळी ठेवण्यात आली आहे.  विसर्जन तलावांवरही चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मुख्य तलावांवर स्वयंसेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी व सुरक्षेसाठी सर्व व्यवस्था केली आहे.

नाशिक महापालिकेने विसर्जनासाठी २७ नैसर्गिक, तर ५६ कृत्रिम तलावांची यादी जाहीर केली आहे. तसेच पीओपीच्या मूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केले आहे. महापालिकेकडून विसर्जनस्थळे निश्चित करण्यात आली असून  पालिकेकडून 'टँक ऑन व्हिल्स' उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.  विसर्जन आपल्या दरीशी साधर्म्य असणारा हा उपक्रमास  दीड दिवसांच्या गणेश विसर्जनानंतरपासूनच उत्तम प्रतिसाद लाभला आहे. 

अशाप्रकारे बदलणाऱ्या शहरांना अनुरूप अशा पर्यावरण पूरक सुविधा गणेशोत्सवासाठी राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी  केलेल्या आहेत.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...