मतदान जनजागृती अभियानासाठी मोटर बाईक रॅलीचे आयोजनही केले होते. या मोटर बाइक रॅलीची सुरुवात भक्ती-शक्ती चौक, निगडी येथून करण्यात आली. निगडी प्राधिकरण, महापालिकेचे 'अ' क्षेत्रीय कार्यालय, वाल्हेकरवाडी, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, डांगे चौक, जगताप डेअरी चौक, शिवार गार्डन, कोकणे चौकातून रहाटणी चौकात, काळेवाडी रोडला, चिंचवड स्टेशन चौक, पिंपरी चिंचवड महापालिका भवन मुख्यालय या ठिकाणी मोटार बाइक रॅलीची सांगता झाली. मतदान जागृतीचे घोषवाक्य लिहिलेले फलक हाती घेऊन मतदान जागृती करण्यात आली.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने पिंपरी-चिंचवडमध्ये जनजागृतीचे अनेक उपक्रम हाती घेतले. नागरिकांनी मतदान करून हक्क बजावावा, यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेनेही जनजागृती केली. मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी महापालिका विशेष प्रयत्नशील होती पिंपरी -चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी (१३ मे) सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे, यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड पालिकेचे आयुक्त डॉ. शेखर सिंह यांच्या द्वारे देण्यात आले.
अशाप्रकारे पिंपरी-चिंचवड महानगपालिकेने मतदान आणि मतदार जागृती अभियान राबवून राज्य तसेच देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी भरीव योगदान दिले.
Facebook: https://www.facebook.com/MAHAUDD
Twitter: https://twitter.com/MAHA_UDD
Instagram: https://www.instagram.com/maha_udd/
Blog: https://mahaudd.blogspot.com/
YouTube: https://www.youtube.com/channel/UCe9-Tq8QTPQ4h8IyXp2wbvw
LinkedIn: https://tinyurl.com/2bpdv9sv
Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x
No comments:
Post a Comment