Friday, January 19, 2024

मुंबईचा प्रवास जलद होतोय - भाग १

कुठल्याही राज्याचे सक्षम दळणवळण हे त्या राज्याच्या प्रगतीला गती देतं आणि म्हणूनच हे प्रकल्प लवकरात लवकर पुर्णत्वास आणण्यासाठी राज्य शासन सातत्याने पाठपुरावा करत आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि इतर लगतची शहरं हि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या खांद्याला खांदा भिडवून विस्तारत चाललेली आहेत आणि म्हणूनच आता मुंबई महानगर प्रदेश बनली आहेत. येथील वाढती लोकसंख्या, नवनवीन बांधकाम प्रकल्प, मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होणारा रोजगार यांमुळे ही शहरे बऱ्याच अंशी मुंबईवरील अतिरिक्त ताण कमी करत आहेत. परंतु, हि शहरं प्रगती करत असताना वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्याचे प्रयत्न राज्य शासनाकडून होत आहेत.

मुंबईच्या दाटीवाटीच्या सध्याच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही आदर्शवत व्यवस्था असणे अपेक्षित आहे. मात्र, मुंबईत एका चार चाकी वाहनाला एका प्रवाशासाठी १५ चौरस मीटर जागा लागते तर रेल्वे गाडय़ा एका चौरस मीटरमध्येच १५ प्रवाशांना घेऊन प्रवास करतात. यावरूनच शहराच्या सार्वजनिक वाहतुकीबाबतची सद्य परिस्थिती आपल्याला लक्षात येईल. ही तफावत दूर होणे ही शहराच्या दृष्टीने आवश्यक बाब आहे. आणि म्हणूनच मेट्रो प्रकल्प, वाहनतळ उभारणे, मोनो रेल, बस सुविधा, मोठमोठे उड्डाणपूल बांधणी अशा नियोजन पूर्ण प्रकल्पामुळे मुंबईचा प्रवास जलद होतोय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

वाहनतळांचा विकास

मुंबईतील सार्वजनिक वाहनतळांची जागा ही अत्यंत थोडी आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी अगदी मोफत उभ्या असलेल्या वाहनांना मोफत उभे राहू न देणे ही वाहनतळ धोरणातील बदलासाठी आवश्यक बाब आहे. गाडय़ांचे मोफत रस्त्यावर उभे राहणे बंद करून या  गाडय़ांचे मूल्य घेऊन सुरू केलेले वाहनतळ चालवणे हे धोरण गेल्या काही वर्षात महापालिकेने राबवले आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला. मुख्य रस्त्यावरील, चौकातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास जलद होऊ लागला. परिणामतः सध्याच्या वाहनतळांच्या अधिकृत जागांमधून मिळणारे उत्पन्न वाढून  उत्पन्न मिळू लागले.

 वरळी येथे पालिकेच्या इंजिनिअरींग हबजवळ पालिकेतर्फे भूमिगत बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार असून मुंबई महापालिका तसे नियोजन करत आहे. बहुमजली स्वयंचलित वाहतनतळ तयार करण्यासाठी आराखडा तयार करणे, बांधकाम करणे या कामाकरीता पालिकेने निविदा मागवल्या आहेत. चार वर्षात हे भूमिगत वाहनतळ बांधून पूर्ण करायचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अंतर्गत आतापर्यंत मुंबादेवी आणि माटुंगा अशा दोन ठिकाणी भूमिगत बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. रोबो अर्थात स्वयंचलिक पार्किंग उभारण्याकरीता कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. ही वाहनतळे पूर्ण झाल्यानंतर माटुंगा येथे ४७५ वाहनांसाठी तर मुंबादेवी येथे ५४६ वाहनांसाठी जागा निर्माण होऊ शकणार आहे. पालिकेच्या मालकीची उद्याने, क्रिडांगणांच्या मोकळ्या जागेत, जमिनीखाली किंवा जमिनीवर अशी वाहनतळे तयार केली जाणार आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून पालिकेने आता अशीच सुविधा आणखी तीन ठिकाणी देण्याचे ठरवले आहे. वांद्रे पश्चिमेकडे पटवर्धन उद्यान, वरळी इंजिनिअरींग हब आणि हुतात्मा चौकात वाहतूक बेटाजवळ वाहनतळ उभे केले जाणार आहे. त्यापैकी वरळी येथे वाहनतळ उभारण्यासाठी आराखडा तयार करणे, वाहनतळ उभारणे याकरीता नियोजन सुरु आहे. वाहनतळाची वार्षिक देखभाल आणि पार्किंगच्या यंत्रणेची सुविधा देणे या कामासाठी कंत्राटदाराला तब्बल २० वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे. तर वाहनतळाचे प्रचालन,साफसफाई याकरीता पाच वर्षांचे कंत्राट दिले जाणार आहे. या वाहनतळांमध्ये शटल व रोबो पार्किंगची सुविधा असेल. अशा प्रकारच्या भूमिगत वाहनतळांमुळे शहरातील वाहतूककोंडी दूर होऊन मुंबईकरांचा वेळ निश्चितच वाचणार आहे.

कोस्टल रोड

मुंबईची वाहतूक कोंडी संपवण्यासाठी मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड तयार करण्यात येत आहे. प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान १०.५८ किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ७० टक्के वेळेची बचत तर होणार असून इंधनाचीही ३४ टक्के बचत होणार आहे.  कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे दक्षिण भाग आणि उत्तर भाग. यामध्ये दक्षिण भागाचं काम अगोदर हाती घेतले आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान, जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे. जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरपासून वरळी-वांद्रे सीलिंकपर्यंत आहे.

मुंबई ट्रान्सहार्बर लिंक

२०२४ या नव्या वर्षात महाराष्ट्राच्या विकास पर्वाची सुरुवात अतिशय धडाक्यात झाली आहे.   भारताचे  पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे उद्घाटन काही दिवसांपूर्वी  पार पाडले.  सुमारे २२ किलोमीटर अंतराचा हा सागरी मार्ग अटल सेतू या  नावाने ओळखला जातो. या सागरी सेतूचे वैशिष्ट्य म्हणजे सीएसटी ते एक्सप्रेसवेचा प्रवास आता अर्ध्या तासाने कमी होणार आहे. ट्रान्स हार्बर लिंकमुळे हा प्रवास वेगवान होणार तर आहेच.  शिवाय देशातील सर्वात लांब समुद्री पूल असणारा मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंकमुळे मुंबई आणि नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार आहे. हे अंतर फक्त २० मिनिटांत पार करता येणार आहे. सीएसटी ते एक्सप्रेसवे हा प्रवास तब्बल अर्धा तासाने कमी होणार आहे.  या पुलामुळे आजुबाजूच्या भागातही आर्थिक विकास होणार आहे.

 मुंबईचा वेळ कसा वाचणार ?

 ट्रान्स हार्बर लिंक दक्षिण मुंबईतील शिवडीमधून सुरू होईल. ठाणे खाडी ओलांडून नवी मुंबईच्या चिर्ले भागापर्यंत हा ब्रिज आहे. सागरी सेतू सुरू झाल्यामुळे मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. या प्रवासासाठी फक्त २० मिनिटांचा वेळ लागणार आहे. रोज या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना याचा खूप फायदा होणार आहे. नेहमीच्या ईस्टर्न फ्रीवे आणि सायन-पनवेल हायवे या मागपिक्षा इथे प्रवासाला कमी वेळ लागणार आहे. दक्षिण मुंबई ते न्यू एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाइड एरिया (नैना) क्षेत्र आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेपर्यंत प्रवास करताना याचा फायदा होणार आहे. वाहतूक जास्त असताना नैना आणि एक्स्प्रेस वेवर जाताना ३०-४५  मिनिटांची बचत होणार आहे.

सायन-पनवेल रस्त्यावरून जास्त वाहतूक नसताना, सीएसएमटी ते कळंबोली जंक्शनपर्यंत येण्यासाठी ७१  मिनिटे लागतात.  एमटीएचएल (MTHL)मुळे या प्रवासासाठी ६८  मिनिटे लागतील असा अंदाज आहे.

 MTHL ब्रिज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी पोर्ट, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई गोवा हायवे यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी हा उत्तम पर्याय आहे.

वाहतूककोंडीतून सुटकेसाठी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम' (ITMS)

 मुंबईतील वाहतुकीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आधुनिक वाहतूक प्रणाली 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम' (ITMS) हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

 ITMS प्रकल्पामध्ये विकसित होणारी यंत्रणा ही अत्याधुनिक असेल. रस्त्यांच्या लांबीनुसार वाहनांची संख्या निश्चित करून तसंच रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण विचारात घेऊन प्रत्यक्षपणे सिग्नल यंत्रणेच्या वेळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे बदल करणे शक्य होणार आहे. तसंच गरजेप्रमाणे सिग्नल यंत्रणेची वेळ प्राधान्यक्रमानुसार बदलता येणार आहे. स्मार्ट सिग्नलिंग, लायसन्स नंबरप्लेट ओळख, अतिवेगवान अथवा चुकीच्या दिशेने येणारी वाहने आणि अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण, चोरीची वाहने शोधण्यास मदत, दंडवसुलीत वाढ हे फायदे या प्रकल्पातून साध्य होणार आहेत."ITMS ही पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून असणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेचा उपयोग शहरातील वाहतुकीचे नियंत्रण योग्य प्रकारे करण्यासाठी सिस्टिमची मदत होणार आहे, मुंबईतील वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वपूर्ण आहे,"

ITMS मध्ये शहरातील सगळे सिग्नल एकमेकांशी जोडलेले असतील. ही पूर्णपणे स्वयंचलित असणार आहे. यात कसल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नसेल. एखाद्या रस्त्यावरची गर्दी आणि बाकीच्या रस्त्यांवरची स्थिती बघून ही सिस्टिम काम करेल. यात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यात येईल."

"उदाहरणार्थ, सकाळी दक्षिणेकडे जाणाऱ्या रस्त्यांना गर्दी असते. संध्याकाळी उत्तरेकडे जाणाऱ्या दिशेला गर्दी होते. ट्रॅफिक सिस्टिममधून या सगळ्या बाबींचा समन्वय राखला जाईल. जास्त गर्दी असलेले रस्ते, कमी गर्दीचे रस्ते या बाबी लक्षात घेऊन त्या ठिकाणच्या सिग्नलच्या वेळेमध्ये आवश्यक बदल करण्यात येईल. विदेशातील प्रमुख शहरांमध्ये वापरण्यात येत असलेली यंत्रणा प्रथमच मुंबईत वापरण्यात येणार आहे."

मुंबईतील मेट्रो प्रकल्प

 मुंबई शहराचा विकास करायचा असेल तर फक्त मुंबईसाठी प्रकल्प हाती न घेता, आसपास असलेल्या शहरांचा देखील एकत्रित विकास करणे गरजेचे आहे. त्यामुळेच मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) आणि इतर संस्थांच्या माध्यमातून केंद्र-राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भागिदारी या विकासकामांमध्ये आहे.

अक्वा लाईन म्हणजेच मेट्रो 3 पहिला टप्पा (Mumbai Metro 3 Aqua Line)

युती सरकारच्या काळातील सर्वात जास्त चर्चिला गेलेला आणि वादातीत प्रकल्प म्हणजे मेट्रो 3. मुंबईच्या मध्यभागातून म्हणजेच सिप्झ ते कुलाबा असा भूमिगत मेट्रो मार्गिकेचा हा प्रकल्प आहे. अनंत अडचणी पार करत या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्याचे काम देखील आता पूर्ण होत आहे. याचा पहिला टप्पा म्हणजे सिप्झ ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आहे. त्याचे काम सद्य स्थितीला 95 टक्के पूर्ण झाले आहे. 17 किमीची ही मार्गिका आहे. यामध्ये सिप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार रोड, आंतरदेशीय विमानतळ, सांताक्रुझ, विद्यानगरी आणि बीकेसी हे स्टेशन येतात. सद्य स्थितीला या पहिल्या टप्प्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. 


 Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...