Friday, January 19, 2024

मुंबईचा प्रवास जलद होतोय - भाग २



मुंबईजवळील शहरातही प्रकल्पांचे लोकार्पण 

हे
मुंबईमधील प्रकल्प आहेत. काही प्रकल्प हे नवी मुंबई, डोंबिवली, भिवंडी आणि ठाणे या भागातील आहेत. यापैकी काहींचे काम बाकी आहे तर काहींचे काम पूर्ण होऊन ते लोकांना वापरण्यास खुले करण्यात आले आहेत. मात्र त्यांचे औपचारिक उद्घाटन राहिले आहे.

नवी मुंबई मेट्रो (Navi Mumbai Metro)

नवी मुंबईतील बेलापूर ते पेंढार रोड पर्यंत मेट्रो मार्गिका बांधून तयार झाल्यामुळे कोणत्याही औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमाशिवाय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ही मार्गिका लोकांसाठी खुली करण्यात आली. 11 किलोमीटर पर्यंत असलेली ही मेट्रो बारा वर्षांपासून रखडली होती. या मार्गिकेवर अकरा स्थानके आहेत. सद्य स्थितीला ही मेट्रो नागरिक वापरत आहेत मात्र पंतप्रधानांच्या हस्ते औपचारिकरित्या तिचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

बेलापूर-नेरूळ ते उरण रेल्वे मार्गिका  (Belapur CBD to Nerul To Uran Railway)

नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील बेलापूर आणि नेरूळ या स्थानकांना उरण शहरापर्यंत जोडण्यासाठी एक नवीन मार्गिका निर्माण करण्यास मार्च 2017 मध्ये सुरुवात झाली. या नवीन कॉरिडॉर चा खर्च 1782 कोटी इतका आहे. याचा पहिला टप्पा बेलापूर-नेरूळ ते खारकोपर हा नोव्हेंबर 2018 मध्ये खुला करण्यात आला. मात्र खारकोपर ते उरण हा रेल्वे मार्ग देखील आता तयार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सुरक्षा प्रमाणपत्रदेखील मध्य रेल्वेला दिले आहे. काही बारीक सारीक काम सोडले तर हा मार्ग लगेच सुरू होऊ शकतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वे मार्गाचे देखील लोकार्पण नवीन वर्षात केली जाईल.

दिघा स्टेशन (Digha Station)

ऐरोली कळवा कॉरिडॉर निर्माण करण्यास 2016 मध्ये सुरुवात झाली. याच प्रकल्पातील एक स्टेशन जे ऐरोली आणि ठाणे स्थानकांच्या दरम्यान आहे ते म्हणजे दिघा. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) मार्फत या प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. उरण रेल्वे मार्गिके प्रमाणेच या स्टेशनचे देखील लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच करण्यात येईल.

मोठागाव माणकोली पूल

डोंबिवली येथील मोठा गावापासून सुरू होणारा आणि भिवंडीतील माणकोली येथे उतरणारा हा उड्डाणपूल एमएमआरडीएने बांधला आहे. या उड्डाणपुलावरील इतर सर्व काम पूर्ण झाले असून सद्यस्थितीला 98 टक्के काम पूर्ण झाल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे. 1.2 किमी लांब असा हा पूल 2017 मध्ये बांधण्यास सुरुवात झाली. सद्य स्थितीला हा पूल बांधून तयार आहे. या पुलामुळे डोंबिवली ते ठाणे हे अंतर केवळ 20 मिनिटात पार करता येणार आहे.

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्याकरीता थेट रस्ता उपलब्ध नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या वाढत्या गर्दीचा विचार करता या जलदगती थेट रस्त्याची आखणी केली आहे जेणेकरुन पश्चिम द्रुतगती महामार्गावरुन थेट आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्याकरिता प्रवाशांना सुविधा उपलब्ध् होईल.

सहारा उन्नत मार्ग

जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुननिर्माण अभियानांअंतर्गत (JNNURM) हा प्रकल्प मंजूर झालेला आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्ग ते विमानतळ (उन्न्त रस्ता) प्राधिकरणा अंतर्गत प्रकल्पाची लांबी 2.20 कि.मी आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली पादचारी व वाहन भुयारी मार्ग तसेच  आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. 

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जागतिक दर्जाचे व्यापार व उद्योग केंद्र म्हणून देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचे महत्व् व स्थान अनन्यसाधारण आहे, तथापि, जागतिक दर्जाच्या पायाभूत नागरी सुविधांच्या अभावामुळे आणि मुंबई शहरातील वाढती गर्दी, वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे सतत होणारी वाहतुकीची कोंडी याचा विचार करता  मुंबईतील वाहतुकीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या सहाय्याने मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे.

सदर प्रकल्पाचा भर प्रामुख्याने रेल्वे वाहतुकीच्या सुधारणांवर आहे म्हणून मुंबई शहराच्या पायाभूत सुविधांची सद्याची तसेच मोठया प्रमाणात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. कार्यक्षम व जलद वाहतुक वितरण आराखडा (Traffic dispersal model) तयार करणे, मुंबई दक्षिण रस्त्यांचा व पूर्व-पश्चिम जोडरस्त्याचा विकास व सुधारणा करणे, सार्वजनिक परिवहन सेवेसाठी स्वतंत्र मार्ग निर्माण करणे, पादचाऱ्यांकरिता सुरक्षित व सुलभ ये-जा करण्यासाठी पादचारी पूल, भुयारी मार्ग, पदपथ व रेल्वे स्थानक परिसर वाहतूक सुधारणा कार्यक्रम राबविणे,  मुंबईमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळांना जोडणाऱ्या उच्च् क्षमतेच्या व जलद मार्गाची तरतूद करणे, मुंबईतील रेल्वे मार्गावर रेल ओव्ह्र ब्रीज बांधून लेव्ह्ल क्रॉसिंग बंद करणे. बस स्थानक/आगार निर्माण करणे आणि तेथे प्रवाशांकरिता सुविधांची निर्मिती करणे ही या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत.

मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत डी.पी.रोडची सुधारणा / बांधकाम उन्नत रस्ते, उड्डाणपूल रेल्वे पूल, पादचारी व वाहन भुयारी मार्ग, स्कायवॉक उभारण्यात येणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व परिवहन व्यवस्थेची कार्यक्षमता, गुणवत्ता आणि सक्षमीकरण करण्यासाठी MMRDA) ने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP) अंतर्गत आणि जागतिक बँकेच्या तांत्रिक सहाय्याने वर्ष 2008 मध्ये वर्ष 2031 पर्यंत सर्व परिवहन साधने समावेशक सर्वंकष परिवहन अभ्यास (Comprehensive Transportation Study) आणि व्यवसाय आराखडा (Business Plan) तयार केला.

सर्वंकष परिवहन व अभ्यास व त्यासाठीचा व्यवसाय आराखडा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर गेल्या दशकात महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर परिवहन आणि जमीन वापर (Landuse) यात सुधारणा झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने वडाळा येथील नवीन जमीन वापर, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावित सुधारणा, मेट्रो रेल्वे आणि मोनो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी आणि त्यांचे कार्यान्वयन, प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ (NMIA), नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र (नैना), जेएनपीटी येथे प्रस्तावित विशेष आणि आर्थिक क्षेत्र (SEZ), कल्याण आणि भिवंडी परिसरात 27 आणि 51 गावांचा विकास आराखडा आणि सदर गावांमध्ये सुचित क्षेत्राचा समावेश, प्रस्तावित जलवाहतूक प्रकल्प इत्यादीचा प्रामुख्याने समावेश आहे.

सदर अभ्यासामध्ये मुंबई महानगर प्रदेशासाठी वर्ष 2041 पर्यंत 487 कि.मी. चे मेट्रोचे जाळे,  232 कि.मी. चे नवीन उपनगरीय रेल्वेचे जाळे, 1090 कि.मी. चे महामार्ग, 560 कि.मी.च स्वतंत्र बस मार्गिका /जलद बस,  वाहतुक सेवा प्रणाली, 4 शहरीय बस टर्मिनल, 13 शहरांतर्गत बस टर्मिनल, 5 इंटरसिटी रेल टर्मिनल, 7 मल्टी मॉडल हब (बहु-वाहतुक केंद्र), 5 मेजर ट्रक टर्मिनल, 14 मिनी ट्रक टर्मिनल आणि 24 प्रवासी जल वाहतुक टर्मिनल, विविध शिफारसींचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या परिवहन आणि वाहतुक व्यवस्थेमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल. तसेच सदर अभ्यासामध्ये वरील शिफारशींची 2041 पर्यत अंमलबजावणी करण्याकरीता नियोजन करण्यात आले आहे.

मुंबईतील मेट्रो प्रकल्प, नागरिकांसाठी पर्वणी

‘मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट केली जात आहे. त्यासाठी मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) सह ३५७ किलोमीटरच्या मेट्रोचे जाळे विणले जात आहे. त्यात १४ मेट्रो मार्गिकांचा समावेश असून, या सर्व मार्गिका २०४० पर्यंत कार्यान्वित होतील आणि मेट्रो ही मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरेल, असा विश्वास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालक आणि मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केला.

बईतील पहिली पूर्णत: भुयारी असलेली मेट्रो ३ मार्गिका पूर्णत्वास नेणे हे आर्थिक, तांत्रिकदृष्टय़ा मोठे आव्हान होते. ती सर्व आव्हाने पेलत आज मेट्रो ३ मधील आरे ते बीकेसीपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही महिन्यांतच हा पहिला टप्पा सुरू होईल आणि पहिल्या भुयारी मेट्रोतून मुंबईकरांना प्रवास करता येईल.

मेट्रो ३ चा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर पुढील सहा-सात महिन्यांत बीकेसी ते कुलाबा असा दुसरा टप्पा सेवेत दाखल होईल. मेट्रो ३ नंतर एक-दोन वर्षांत आणखी काही मेट्रो मार्गिका सुरू होतील. या मार्गिका एकमेकांना जोडल्या जातील आणि २०४० मध्ये शहरभर मेट्रोचे जाळे उभे राहील.

या आणि भविष्यात होऊ घातलेल्या अशा अनेक वाहतूक प्रकल्पांमुळे मुंबईचा प्रवास सुकर होतोय, वेगवान होतोय आणि वाढत्या लोकसंख्येनुसार या सुलभ प्रवासाचे अनेक पर्याय जन्माला येतायत. भविष्यात मुंबईच्या या प्रवासाचे सुखावह चित्र आपल्याला पाहायला मिळेल हे निश्चित.


 Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...