Tuesday, November 28, 2023

नुकताच चंद्रपूर महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा झाला. त्यानिमित्ताने चंद्रपूर शहराच्या विकासावर टाकलेला प्रकाशझोत

वाहतुकीतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पेट्रोल-डिझेलवरील वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा, यासाठी चंद्रपूर महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे. नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदीसाठी सोयीचे व्हावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका मुख्यालय शेजारील पार्किंगमध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने माझी वसुंधरा अभियान २.० व राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत गुरुवार, दिनांक १६ डिसेंबर रोजी आयोजित इलेक्ट्रिक वाहने व सौर उपकरण प्रदर्शनाला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इलेक्ट्रिक वाहने शून्य उत्सर्जनामुळे पर्यावरण संवर्धनासाठी फायदेशीर आहेत. कमी दुरुस्ती खर्च, चालवण्यास सुलभ, घरी चार्जिंग करणे सोयीचे, कमी खर्चात चार्जिंग, ध्वनी प्रदूषणविरहित आहे. सौरऊर्जा हा ऊर्जेचा नैसर्गिक आणि प्रदूषणरहित स्रोत समजला जातो. त्यामुळे चंद्रपूर मनपा सौर ऊर्जेच्या वापरावर भर देत आहे.

घराच्या छतावर पडणारे पाणी रस्त्यांवरून वाहू लागते. नाले भरून वाहू लागतात. वाहुन जाणारे हे पाणी जर रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून जमिनीत साठविले गेले तर पाण्याचे दुर्भिक्ष्य नक्कीच कमी होईल, यासाठी राखीताई आग्रही आहेत. रेनवॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकातर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना मालमत्ता करात २ टक्के सूट व रु. २५००/-  अनुदान देण्याची योजना त्यांनी जाहीर केली. यासह अनेक महत्वपूर्ण योजना त्यांनी सुरु केल्या. मनपा हद्दीत ८७ हजार मालमत्ता आहेत. यातील अधिकाधिक इमारतींमधे ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. मनपाच्या सर्व ५ इमारती, २९ शाळा, ६ सार्वजनिक आरोग्य केंद्रे, १२ सार्वजनिक शौचालये अशा एकूण ५२ इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे.

चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची यात्रा दरवर्षी होत असते. आंध्रप्रदेश, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील भाविकवर्ग मोठ्या प्रमाणात चंद्रपुरात दाखल होतात. आरोग्य, स्वच्छता, वैद्यकीय सेवा आणि पाणीपुरवठ्यासह निवासाची व्यवस्था केली जाते. दुकानदारांना जागावाटप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने यात्रा परिसरात यात्रा कार्यालयाची स्थापना करण्यात आली. या कार्यालयाचे उद्घाटन महापौर राखी यांच्या हस्ते झाले. येथे येणारे भाविक झरपट नदीत पवित्र स्नान करतात. त्यासाठी गौतमनगर येथील बैल बाजारपासून झरपट नदी पात्रातील इकॉर्निया अड़विण्याकरीता ताटव्याचे बांध तयार करण्यात आले.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...