Wednesday, November 22, 2023

पिंपरी चिंचवड शहराच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘सहाव्या ग्वांगझू इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर अर्बन इनोव्हेशन’मध्ये (ग्वांगझू अवॉर्ड) ५४ देशातील १९३ शहरांचा समावेश होता. त्याची अंतिम फेरी सुरू असून, त्यात १५ शहरांची निवड झाली आहे. त्यामध्ये देशातील एकमेव पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला आहे. विजेतेपदासाठी ऑनलाइन मतदान प्रक्रिया सुरू आहे. ३० नोव्हेंबर रोजी रात्री बारापर्यंत मतदान करता येणार आहे. सात डिसेंबरला निकाल आहे. सद्यःस्थितीत द्वितीय क्रमांकावर शहर आहे. रिपब्लिक ऑफ कोरियातर्फे २०१२ पासून सिटी ऑफ ग्वांगझू, यूसीएलजी आणि मेट्रोपोलिसद्वारे सह-प्रायोजित शहरी नवोपक्रमासाठी ग्वांगझू इंटरनॅशनल अवॉर्ड देण्यात येत आहे.

अवॉर्ड कशासाठी?

ज्ञान निर्मितीला चालना देणे आणि शहरी नावीन्यतेमध्ये शिक्षण सुलभ करणे, यासाठी जागतिक व्यासपीठ म्हणून ‘ग्वांगझू इंटरनॅशनल अवॉर्ड’ संकल्पना उदयास आली आहे. त्यामध्ये गेल्या पाच टप्प्यामधून जगभरात तेराशेहून अधिक उपक्रम सादर केले आहेत. परिवर्तनशील शहरी विकास पद्धतींना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे, हा यामागील हेतू आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहभाग नोंदविला आहे.

अंतिम १५ शहरे

‘ग्वांगझू इंटरनॅशनल अवॉर्ड’साठी अंतल्या (तुर्किये), बोगोटा (कोलंबिया), केपटाऊन (दक्षिण आफ्रिका), ग्वांगझू (कोरिया), हलांद्री (ग्रीस), इज्तापालापा (मेक्सिको), जाकार्ता (इंडोनेशिया), कंपाला (युगांडा), कझान (रशिया), मॅनहाइम (जर्मनी), रामल्लाह (पॅलेस्टाईन), साओ पाउलो (ब्राझील), तेहरान (इराण) आणि झियानिंग (चीन) ही शहरे जगभरातील शहरी नवकल्पनांचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

असा झाला प्रवास

जगातील ५४ देशांमधील १९३ शहरे आणि प्रदेशांमधील तब्बल २७४ उपक्रमांचे ग्वांगझू पुरस्कारासाठी अर्ज आले होते. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडच्या ‘नवी दिशा’ उपक्रमाचा समावेश आहे. पुरस्कार प्रक्रियेतील सादरीकरण मूल्यांकनासाठी ११ ते १४ सप्टेंबर या कालावधीत ग्वांगझू लायब्ररीमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा समावेश असलेली तांत्रिक समितीची बैठक झाली. समितीमार्फत शाश्वत विकास उद्दिष्टे, न्यू अर्बन अजेंडाच्या स्थानिक अंमलबजावणीच्या पाठपुराव्याशी संबंधित बाबींची पडताळणी झाली. निवड प्रक्रिया, नवकल्पना, परिणामकारकता, संदर्भ आणि प्रतिकृती यांसारखे निकष लावले होते. त्यातून निवड झालेल्या ४५ पात्र उपक्रमांपैकी अंतिम १५ शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश झाला आहे.

संकेतस्थळावर आवाहन

महापालिकेने संकेतस्थळावर ‘करू या पिंपरी-चिंचवडला मतदान, वाढेल जगात भारताचा सन्मान’ असे घोषवाक्य दिले आहे. ग्वांगझू अवॉर्डसाठी ‘नवी दिशा’ उपक्रमाचा समावेश आहे. ‘क्यू आर कोड स्कॅन करा आणि मत नोंदवा’ असे आवाहन करत संकेतस्थळावरील ‘लिंक क्लिक’ करून शहराला मतदान करा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान होण्यासाठी मतदान करा,’ असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

काय आहे 'नवी दिशा' उपक्रम

शहरातील महिला करतात सामुदायिक शौचालयांची देखभाल दुरूस्ती

पिॅपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ नवी दिशा’ उपक्रमाअंतर्गत महिलांना रोजगार

वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहरात स्वच्छता राखण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर असते. मात्र या आव्हानाला ‘नवी दिशा’ देत पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील महिलांना या कामात सामावून घेतले आणि गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होतानाच स्वच्छ आणि सुंदर शहराचा प्रवास सुरू झाला. 

शहरातील झोपडपट्टी भागात असलेल्या सामुदायिक शौचालयाच्या देखभाल आणि दुरूस्तीचे काम गरजू महिलांना देऊ करत पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘नवी दिशा’ उपक्रमाअंतर्गत जागतिक नकाशावर आपले वेगळेपण सिध्द केले आहे.

विशेष म्हणजे या उपक्रमाची चीनमधील सहाव्या ग्वांग्झो इंटरनॅशनल अवॅार्ड फॅार अर्बन इनोव्हेशन साठी पहिल्या १५ शहरामध्ये निवड झाली आहे. १९३ शहरांनी या पुरस्कारासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी भारतातील पिॅपरी चिॅचवड हे एकमेव शहर आहे. याच पुरस्काराचा एक भाग म्हणजे ‘सिटी ॲाफ चॅाईस’.

नागरिकांनी त्यांच्या आवडीचे शहर सिटी ॲाफ चॅाईस’ मध्ये घोषित करण्यासाठी पिॅपरी चिंचवड शहराला मत द्यायचे आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी शहराला मत देऊन आपल्या भारतातील पिंपरी चिंचवड शहराला नागरिकांच्या पसंतीचे शहर घोषित करून जिॅकवून देण्याचे आवाहन पिॅपरी चिॅचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

https://vote.guangzhouaward.org/vote.html या लिॅकवर नागरिकांनी मत नोंदवायचे आहे. 

विकासाची गती साधताना समाजातील सर्व घटकांना, विशेषतः उपेक्षित समुहांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने विविध योजना तसेच सर्वसमावेशक धोरणांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेच्या वतीने महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी महिला बचतगटांना ‘नवी दिशा’ उपक्रमांतर्गत सामुदायिक शौचालय देखभाल आणि दुरूस्तीचे काम दिले जात आहे. हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणेची दिशा दाखविणारा असून यातून बचतगटांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.

शहरात झोपडपट्टी भागात राहणार्या नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित शौचालय मिळावे यासाठी पिॅपरी चिंचवड महापालिकेने ७१ झोपडपट्टी परिसरात १६० सामुदायिक शौचालयांची निर्मिती केली. मात्र या शौचालयांची देखभाल करण्याचा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर होता. आणि त्यामुळे सुरूवातीच्या काळात परिसरातील नागरिकांनी शौचालय वापरण्यास नकार दिला. ही बाब लक्षात घेत पिॅपरी चिॅचवड महापालिकेच्या सामाजिक विकास विभाग आणि आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात  महिलांचा सहभाग आणि शौचालय देखभालीसाठी नागरिकांचा पुढाकार याची कमतरता असल्याचे जाणवले. यातूनच सुरू झाला ‘नवी दिशा - सामुदायिक शौचालय प्रकल्प’

महापालिकेने केलेल्या जागृती अभियानात महिलांना या शौचालयाच्या देखभाल आणि दुरूस्तीसाठी आवाहन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्यातून आज ४० बचतगटातील महिला त्यांच्या परिसरातील सामुदायिक शौचालयाची स्वच्छता करतात. प्रत्येक शौचालय सीटच्या देखभाल दुरूस्तीसाठी प्रति महिना ९०० रूपये मानधन या बचतगटांना देण्यात येते. 

याचा परिणाम म्हणजे ३० हजार नागरिकांना प्रतिदिन स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयाचा लाभ घेता येतो. १४० महिलांना या उपक्रमामुळे रोजगार उपलब्ध झाला असून १६० ठिकाणी उभे असलेले हे सामुदायिक शौचालय आदर्श विकासाचे उदाहरण  आहे.

शहरातील स्वच्छता हा प्रशासनाचा मुख्य हेतू असला तरी स्वच्छता राखताना लोकसहभागातून महिलांना सामील करत त्यांना रोजगार आणि उपजिविकेच्या संधी उपलब्ध करून देणारा पिॅपरी चिॅचवड महापालिकेचा ‘नवी दिशा’ उपक्रम जगभरात आदर्श ठरत आहे.

चला तर मग, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून देऊया, आपल्या भारतातील या शहराला भरघोस मतदान करून ग्वान्गझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून देऊया.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...