Monday, November 20, 2023

नवी मुंबईकरांचे मेट्रो स्वप्न साकार

ब्बल बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवी मुंबईत पहिली  मेट्रो  (NMM) शुक्रवारी १७नोव्हेंबर २०२३ पासून  दुपारी ३.०० वाजल्यापासून  धावू लागली... आणि नवी मुंबईकरांच्या मेट्रो प्रवासाला उत्साहाने सुरुवात झाली आहे.  पेणधर, तळोजा पेठाली, अमनदूत, पेठपाडा, सेन्ट्रल पार्क, खारघर गाव आणि केंद्रीय विहार स्थानकांवर प्रवाशांनी गर्दी करीत आहेत.  सध्या नवी मुंबईत जी मेट्रो धावत आहे, ती नवी मुंबई मेट्रो लाईन-१ मधल्या पहिल्या टप्प्याची आहे.  हा पहिला टप्पा सीबीडी बेलापूर ते पेंढारपर्यंत सुरू होतो. नवी मुंबई मेट्रो लाईन 1 चे ऑपरेशन नवी मुंबई कनेक्टिव्हिटी सुधारण्यात आणि नवी मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटचा विस्तार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. 

मुंबईसाठीची 'सॅटेलाइट सिटी' म्हणून उभारण्यात आलेल्या नवी मुंबईची गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा विकास आणि असंख्य निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांमुळे नवी मुंबई हा रिअल इस्टेटसाठी महत्त्वाचा  पर्याय बनत आहे. या नियोजित महानगरामध्ये अनेक नामांकित शाळा, जागतिक उपक्रम, रुग्णालये, मनोरंजनाचे मार्ग आणि बरेच काही आढळू शकते. मुंबई शहरातील रिअल इस्टेटच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे अनेक गृहखरेदीदार आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणारे नवी मुंबईकडे वळत आहेत. परिणामी नवी मुंबईतील नागरिकांची संख्या वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येला नजीकच्या भविष्यात  प्रवासासाठी कोणत्याही प्रकारची  समस्या निर्माण होऊ नये, तसेच जलंदरीतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकांणी पोहोचता यावे यासाठी नवी मुंबईत मेट्रोची सुरुवात झाली. 

नवी मुंबईतील  हा मेट्रो  प्रकल्प महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) हाती घेतला असून ह्या प्रकल्पात एकूण ११७.३ किमी लांबीच्या ६ मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. ह्यांपैकी सी.बी.डी. बेलापूर- खारघर- तळोजा- पेंधर- खांदेश्वर- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा  नवी मुंबई मेट्रो लाईन १ चा भाग आहे. नवी मुंबई मेट्रो लाईन-१  तीन टप्प्यात बांधली जात आहे. त्यातील पहिला टप्पा हा बेलापूर ते पेंढार असून 

तळोजा ते खांदेश्वर हा दुसरा  टप्पा आहे. तर तिसरा टप्पा हा MIDC ते पेंढार असा असेल.  यापैकी नवी मुंबई मेट्रो लाईन-१ चा बेलापूर ते पेंढार हा  १२ किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा सुरू झालेला असून त्याच्या बांधकासाठी  १,९८५ कोटी रुपये खर्च आलेला आहे. 

नवी मुंबई मेट्रो (NMM) लाइन-१ चा पहिला टप्पा, बेलापूर ते पेंढार, ११.१० किमी लांबीचा आहे आणि त्यात CBD बेलापूर, सेक्टर ७, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक (खारघर), सेक्टर ११, सेक्टर १४, सेंट्रल पार्क, पेठपाडा, सेक्टर ३४, पंचानंद आणि पेंढार या  ११ उन्नत स्थानकांचा समावेश  आहे. जो आता सुरू झालेला आहे. यामुळे खारघर ते तळोजा या मार्गावर शेअर रिक्षा, बसने प्रवास करणाऱ्यांना किफायतशीर दरात मेट्रोने प्रवास करण्याचा सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे.

नवी मुंबई मेट्रो (NMM) लाइन-१ च्या दुसऱ्या टप्प्यात मेट्रो  MIDC तळोजा स्टेशन २ ते खांदेश्वर पर्यंत धावेल. या टप्प्याचे अंतर हे  १०. ३० किमी लांबीचे असून त्यात MIDC स्टेशन  २, MIDC स्टेशन १, कासाडी, सेक्टर ७ ई (कळंबोली), सेक्टर १३ (कळंबोली), सेक्टर १०  (कामोठे), खांदेश्वर ही ८ 

स्थानके असतील., नवी मुंबई मेट्रो लाईन १ प्रकल्पाच्या  या दुसऱ्या टप्प्यासाठी १५०९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर तळोजा आणि खांदेश्वर सारख्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना प्रवास करणे सोपे होणार आहे. नवी मुंबई मेट्रो लाईन १ चा तिसरा टप्पा पेंढार आणि एमआयडीसी तळोजा दरम्यान जोडणारा आहे. हे २.२ किमी लांब आहे आणि यात फक्त एक उन्नत मेट्रो स्टेशन आहे. या इंटरलिंक स्टेशनची अंदाजे किंमत रु. ५७४ कोटी आहे. 

सध्या खांदेश्वर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) हा प्रस्तावित मेट्रो मार्ग आहे. हा नवी मुंबई मेट्रो लाईन १ च्या तिसऱ्या टप्प्याचा हा एक भाग असेल. हा कॉरिडॉर खांदेश्वर मेट्रो स्टेशनला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी (NMIA) जोडेल. हे अंदाजे ५ किमी लांब असेल आणि मुंबई मेट्रोच्या आगामी गोल्ड लाईन किंवा लाईन ८ ला जोडले जाईल. या नव्या प्रस्तावित भागाचा  नवी मुंबई मेट्रो लाईनचा रहिवाशांना खूप फायदा होणार आहे.  कारण यामुळे नवी मुंबईतील विमानतळावर प्रवेश करणे अधिक सुलभ आणि जलद होईल.

प्रवास तिकीट दरांविषयी : 

नवी मुंबई मेट्रो लाईन १ चाप्रवास दर हा 10 रुपये प्रति २ किलोमीटर आहे.२.४ किलोमीटर अंतरासाठी १४ रुपये, तर ४-६ किलोमीटरसाठी २०  रुपये भाडे असेल. शिवाय, ६-८८ किलोमीटरसाठी २५ रुपये, ८ किलोमीटरसाठी ३० रुपये भाडे असेल.तर १०  किलोमीटरसाठी,  ४०  रुपये असा प्रवास दार आहे. या प्रवास तिकीटासाठी  सिडको, महामुंबई मेट्रो नेटवर्क स्टेकहोल्डर, नवी मुंबई मेट्रो ऑटोमॅटिक फेअर कलेक्‍टिंग (एएफसी) साठी निअर फील्ड कम्युनिकेशन (NFC) फोन आणि क्यूआर कोड वापरण्याची परवानगी देण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञान एकत्रित करण्याचा मानस आहे.

पहिली आणि शेवटची मेट्रो कधी धावणार?

तळोजा-पेंधर वरून सुटणारी मेट्रो बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे. मेट्रोने येणाऱ्या प्रवाशांना बेलापूर रेल्वे स्थानकात उतरून हार्बर मार्गे मुंबई , ठाणे येथे जाणे सोईस्कर होणार आहे. तळोजा-पेंधर मार्गावरून सकाळी ६.०० वाजता पहिली मेट्रो धावते. तर रात्री १०.००वाजता तिची शेवटची फेरी असते. प्रत्येक १० मिनिटांच्या अंतराने  तळोजा-पेंधरमार्गावर मेट्रो  धावते. 

नवी मुंबई मेट्रोची वैशिष्ट्ये 

अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे, मेट्रो स्थानकांच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन (एन्ट्री) आणि  निर्गमनाची (एक्झिट) व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर  पार्किंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, पदपथ (फुटपाथ), ऑटो रिक्षांकरिता जागा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, कॉनकोर्स आणि फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली, सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, ही नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. 

रिअल इस्टेट मार्केटवर परिणाम

नवी मुंबई मेट्रो तळोजा, पेंढार, बेलापूर आणि खारघर यांसारख्या प्रमुख निवासी आणि औद्योगिक भागातून जाणार आहे. नवी मुंबईतील या सर्व महत्त्वाच्या भागांना मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे या भागात आणि शेजारच्या प्रदेशातील मालमत्तेची मागणी वाढेल. घरांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे या ठिकाणी आणि मेट्रो मार्गात समाविष्ट असलेल्या कमी ज्ञात प्रदेशांमध्ये मालमत्ता मूल्य १०% ते ३० % वाढेल. उत्तम मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे महत्त्वाच्या व्यावसायिक आणि खाजगी संस्थांसह, नवी मुंबईचे व्यावसायिक केंद्र असलेल्या बेलापूरसारख्या व्यावसायिक क्षेत्रांनाही गती मिळेल. चांगल्या सामाजिक सुविधांमुळे आणि कनेक्टिव्हिटीमुळे, हे क्षेत्र लवकरच गुंतवणुकीवर सकारात्मक परताव्यासह उच्च श्रेणीतील घरांची निवड होईल. मेट्रो मार्गामुळे या ठिकाणी घरांची मागणी आणखी वाढेल असा अंदाज आहे.

सध्या नवी मुंबईतील सतत वाढणारी लोकसंख्या, शहराची वाहतूक समस्या आणि वेगाने होणारे नागरीकरण, शहरीकारण यासाठी नवी मुंबई मेट्रो (NMM) हा सर्वोत्तम उपाय आहे. नवी मुंबईतील सर्व मेट्रो मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी होईल.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...