Saturday, November 11, 2023

दिवाळी निरोगी वातावरणात साजरी करूया ! सजग होऊया ! स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान २.० अंतर्गत स्वच्छ दिवाळी - शुभ दिवाळी अभियान

रेतर दिवाळी  धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी अवघे काही  तासच शिल्लक राहिले आहेत.  दिवाळी म्हणजे काय? तर  दिवाळी  म्हणजे सुबत्ता आणि समृद्धीचे सेलिब्रेशन.  मग यात दिव्यांची रोषणाई आली, घर सजावटीसाठी  केलेले प्रयत्न आहे, खरेदीची झुंबड आली आणि त्याच्या जोडीने केली जाणारी फटाक्यांची आतिषबाजी आली. 

मात्र दिवाळी सेलेब्रेशनमध्ये आता आपल्याला सावधगिरी ठेवावी लागणार आहे. दुरुस्ती करावी लागणार आहे.  ती म्हणजे  फटक्यांची आतिषबाजीत.  वाढते हवा आणि  ध्वनी प्रदुषणामुळे न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.  दिवाळी निरोगी वातावरणात साजरी करायची की फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणात, याचा निर्णय नागरिकांनी घ्यायचा आहे, असे स्पष्ट करून मुंबई शहरासह महानगर प्रदेशात हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने दिवाळीत फटाके वाजवण्यावर उच्च न्यायालयाने   ५ नोव्हेंबर २०२३ पासून निर्बंध घातले आहेत. त्यानुसार आता केवळ सायंकाळी ८ ते रात्री १० असे तीन तासच फटाके वाजवण्यास  परवानगी असेल.

फटाक्यांवरील निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी पोलीस आणि महापालिका प्रशासनाची राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. ‘‘मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावत असल्याने समतोल राखण्यासाठी दिवाळीच्या काळात फटाके वाजवण्यावर निर्बंध घालणे गरजेचे झाले असून त्यासाठी कालमर्यादा न्यायालय नक्कीच निश्चित करू शकते, असे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयाला महापालिका आणि नागरीकांनी सहकार्य  करण्याचे आवाहन केले  आहे. 

दिवाळी निरोगी वातावरणात साजरी करण्यासाठी न्यायालयाने घेतलेले महत्त्व निर्णय पुढीलप्रमाणे - 

  • मुंबई शहरासह महानगर प्रदेशात हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने दिवाळीत फटाके वाजवण्यावर उच्च न्यायालयाने घातले निर्बंध आहेत.  त्यानुसार आता केवळ सायंकाळी ७ ते रात्री १० असे तीन तासच फटाके वाजवण्यास  परवानगी असेल.
  • बेरियम, बोरीक नायट्रेट सारखे विषारी वायू पसरवणारे फटाके वाजवण्यास मनाई. 
  • फटाक्यांवरील निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी पोलीस आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी. न्यायालयाने स्पष्ट आदेश.
  • हवेच्या गुणवत्तेच्या खराब स्थितीकडे लक्ष देण्यासाठी प्राधिकरणांनी एकत्र येऊन पावले उचलण्याची गरज असल्याचे खंडपीठाचे म्हणणे.
  • राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) आणि राज्य आरोग्य विभागाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय समिती न्यायालयाने या वेळी स्थापन केली. ही समिती आदेशांचे आणि कृती आराखडय़ाचे पालन होते की नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम करेल.
  • प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने मार्च २०२३ मध्ये जाहीर केलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल.
  • कृती आराखडय़ाचे पालन करण्यात त्रुटी राहिल्यास प्रभागाच्या सहायक आयुक्ताला वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाणार
  • मोकळ्या जागेत विशेषत: कचराभूमीवर कोणताही कचरा टाकला जाणार नाही याची जबाबदारी नागरीक आणि महापालिकांची असेल. 


स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ : 

फटाक्यांच्या आतिषबाजीवर  सरकारने निर्बंध घातल्यानंतर  स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ हे अभियान सुरूकरण्यात आले आहे. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या‍ दिवाळी उत्सवामध्ये ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ हे अभियान जाहीर करण्यात आले असून दिवाळी कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी केले आहे. या अभियानामध्ये लोकसहभागातून  स्थानिक स्वराज्य संस्था विविध उपक्रम राबवित असून स्वच्छता आणि प्रदूषण प्रतिबंधातून पर्यावरण संरक्षण या बाबीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

या अनुषंगाने दिवाळीपूर्वी घरोघरी केल्या जाणा-या साफसफाईमध्ये नागरिकांकडून त्यांना नको असलेल्या चांगल्या वस्तू मोठया प्रमाणावर कच-यामध्ये टाकून दिल्या जातात. वास्तविकत: या वस्तू गरजूंच्या वापरात येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी साफसफाईतून बाजूला काढलेल्या अशा नको असलेल्या वस्तू  महानगरपालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या थ्री आर सेंटर्समध्ये आणून ठेवाव्यात असे आवाहन  स्थानिक स्वराज्य संस्थानी नागरिकांना केले आहे. , जेणेकरुन ज्यांच्या उपयोगी पडतील असे गरजू नागरिक त्या वस्तू सेंटर्स मधून घेऊन जाता येणार आहेत  ‘नको असेल ते दया, हवे असेल ते घ्या’ या आगळया वेगळया संकल्पनेवर आधारित ‘आहे रे’ वर्गाला ‘नाही रे’ वर्गाशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने स्थानिक संस्थानसाठी सुरू केले आहे. 

पर्यावरणपूरक स्थानिक उत्पादनांचा वापर करणे, एकेरी प्लास्टिकचा वापर टाळणे, टाकाऊ पासून टिकावू वस्तू तयार करणे, प्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना करणे व पर्यावरणपूरक फटाक्यांचा वापर करणे हे अभियानाचे निकष आहेत. या मोहिमेत सहभाग घेण्यासाठी MyGOV पोर्टलवर स्वच्छ दिवाळीची शपथ घेऊन वैयक्तिक प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, तसेच स्वच्छ, पर्यावरणपूरक तसेच सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळून दिवाळी साजरी करावी. जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छ दिवाळीची ऑनलाइन शपथ घ्यावी व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करतानाचे व्हिडिओ अपलोड करावे. असे  आवाहन सरकारने केले आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...