नव्या प्रकल्पांच्या कामाना प्रारंभ आणि अंतिम टप्प्यातील प्रकल्प पूर्ण करून ते सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एमएमआरडीएच्या वतीने सध्या मेट्रो, सागरी सेतू, उन्नत मार्ग, रस्ते सुधार असे प्रकल्प सुरू आहेत. आता सागरी मार्ग, भूमिगत मार्ग, सागरी सेतू, पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण असे नवे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. या पाश्र्वभूमीवर अर्थसंकल्पात २०२३मध्ये पूर्ण होणार असलेल्या आणि कामास सुरुवात होणार असलेल्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या वर्षांत मुंबई पारबंदर प्रकल्प (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) आणि सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे.
तरतूद अशी..
वर्सोवा-विरार सागरी सेतू : २० कोटी, ऑरेंज गेट ते नरिमन पॉईंट भुयारी मार्ग: १५० कोटी, ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग: ३००० कोटी, ठाणे तीन हात नाका वाहतूक सुधारणा: १०० कोटी, चिरले ते खालापूर जोडरस्ता २०० कोटी, बाळकूम ते गायमुख सागरी किनारा मार्ग ५०० कोटी
पालघर विकास कामे १००० कोटी, देहरजी मध्यम प्रकल्प ४४८ कोटी, भिवंडी रस्ते विकास २५ कोटी, पूर्वमुक्त मार्ग विस्तार (छेडानगर ते ठाणे) ५०० कोटी, आनंदनगर ते साकेत रस्ता ५०० कोटी, कल्याण बाह्यवळण रस्ता टप्पा एक आणि तीनसाठी १५० कोटी
२०२३ मध्ये पूर्ण झालेले प्रकल्प(खर्च कोटी रुपयांत) कोटी
मेट्रो २ अ : ६४१० कोटी, मेट्रो ७ : ६०२८ कोटी, एससीएलआर वाकोला-कुर्ला उन्नत मार्ग : ३०० कोटी,
कुरारगाव भुयारी मार्ग : २६ कोटी, कोपरी आरओबी : २५८ कोटी, दुर्गाडी पूल : १०२ कोटी, नावडेफाटा उड्डाणपूल: ७५ कोटी, बोपाणे पूल : ११५ कोटी, मुंब्रा वाय जंक्शन पूल : १०७ कोटी
यंदा पूर्ण होणारे प्रकल्प
मुंबई पारबंदर प्रकल्प, सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्प, विमानतळ पूल, छेडा नगर उड्डाणपूल, कलिना उन्नत मार्ग, ऐरोली ते कटाई रस्ता, मोटागाव ते माणकोली पूल, बाळासाहेब ठाकरे स्मारक, अकुर्ली भुयारी मार्ग
Facebook: https://www.facebook.com/MAHAUDD
Twitter: https://twitter.com/MAHA_UDD
Instagram: https://www.instagram.com/maha_udd/
Blog: https://mahaudd.blogspot.com/
YouTube: https://www.youtube.com/channel/UCe9-Tq8QTPQ4h8IyXp2wbvw
LinkedIn: https://tinyurl.com/2bpdv9sv
Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x
No comments:
Post a Comment