Monday, May 9, 2022

'स्मार्ट सिटी' मिशनमुळे शहरं प्रगतीपथावर

स्मार्ट सिटीज मिशन हा भारत सरकारचा नागरी पुनर्नवीकरण आणि सुधारणा कार्यक्रम असून यात संपूर्ण देशात नागरिकस्नेही,  १०० शहरे विकसित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. त्या त्या शहरांच्या राज्य सरकारांच्या सहकार्याने केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाने हे मिशन राबवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने देशात शंभर शहरे ही मोठ्या शहरांची उपशहरे म्हणून विकसित करण्याचे किंवा मध्यम आकारांच्या शहरांचे आधुनिकीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे.शहरांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे हे उद्दिष्ट होते. देशातील इतर शहरांना "स्मार्ट" होण्यासाठी प्रेरित करू शकतील अशा या शहरांचे मॉडेल तयार करणे हे देखील या अभियानाचे उद्दिष्ट आहे. स्मार्ट सिटी मिशन शहरी भागातील सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्य करते.

स्मार्ट सिटीचे मुख्य घटक 

डिजिटल मापन तंत्रे : वीज, पाणी, गॅस यांच्या सेवा जाळयातील मापके (मीटर्स) आणि सेन्सर्स द्वारे अंकांच्या आकडयांच्या स्वरूपातील (डिजिटल) माहिती मोजणारी उपकरणे     
माहितीचे व्यवस्थापन : वैविध्यपूर्ण आणि संलग्न डिजिटल माहितीचे दूरसंचार माध्यमातून वेगवान वहन, तसेच उपकरणांच्या माध्यमातून एकत्रीकरण, सुसुत्रीकरण आणि प्रमाणित स्वरूपात साठवण.
तंत्राधिष्टीत नियमन आणि नियंत्रण : माहितीचे विश्लेषण करण्यासाठी संगणकीय प्रणालींचा विकास आणि त्यांच्या मदतीने प्रारूपे (मॉडेल्स) तयार करून नागरी सेवांचे प्रभावी आणि तत्काळ नियमन-नियंत्रण, म्हणजेच नागरी सेवांचे व्यवस्थापन करण्याच्या तांत्रिक पध्दती. 

स्मार्ट शहरांची वैशिष्ट्ये
स्मार्ट हेल्थकेअर सिस्टीम, प्रशासन, वाहतूक व्यवस्था, सुरक्षितता, स्मार्ट पायाभूत सुविधा, नोकरीच्या चांगल्या संधी आणि इतर सर्व सुविधा यासह स्मार्ट शहरांमध्ये अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.
  • एखाद्या शहरामध्ये खालील वैशिष्ट्ये असतील तर ते स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाऊ शकते.
  • समाजाच्या सु-विकसित आरोग्य सेवा, शिक्षण, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या गरजा.
  • उत्तम गृहनिर्माण.
  • समाजाची आर्थिक वाढ सुधारणे.
  • रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे.
  • डेटा विश्‍लेषण आणि समुदायाच्या व्यापक सहभागासाठी सु-विकसित स्मार्ट योजना तयार करणे.
  • स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे.
  • लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलासाठी योग्यरित्या शहरीकरण धोरण ठरवणे.
  • समाजाच्या गरजांसाठी स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर
  • सुव्यवस्थित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे.

स्मार्ट शहरे पायाभूत सुविधानी युक्त असतील असे ठरविण्यात आले असून स्मार्ट उपायांद्वारे चांगल्या प्रतीचे जीवनमान ती देऊ शकतील. निश्चित पाणी आणि वीजपुरवठा, निःसारण आणि घनकचरा व्यवस्थापन, कार्यक्षम नागरी वाहतूक, आय़टी कनेक्टिव्हिटी, इ-प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग त्याप्रमाणे नागरिकांची सुरक्षितता ही स्मार्ट शहरांची काही वैशिष्ट्येही वैशिष्ट्ये स्मार्ट शहरांना इतर शहरांपेक्षा वेगळे करतात. शहरांच्या आर्थिक वाढीसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी इतर शहरांना प्रेरणा देण्यासाठी स्मार्ट शहरे विकसित केली जातात.

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...