Thursday, August 18, 2022

शहरातील गरिबांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी

शहरी गरीब लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना उपजीविकेची शाश्वत संधी उपलब्ध करून देण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची अंमलबाजवणी सण २०१५-१६ पासून राज्यात प्रत्यक्ष सुरु झाली. राज्यातील एकूण २५९ नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा प्रकल्प राबवला जातो. या अभियानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या सेवा आणि उत्पादित झालेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विविध सेवा व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शहर उपजीविका केंद्र ही संकल्पना आकारास आली.

शहरी गरीब उत्पादक आणि ग्राहक यांची सांगड घालणे व शहरी गरिबांना माहिती आणि व्यवसायासाठी आवश्यक ते सहाय्य करणे हा शहर उपजीविका केंद्राचा मुख्य उद्देश आहे.


उपजीविका केंद्राच्या सेवा :

शहरी गरिबांना पुढीलप्रमाणे आवश्यक सेवा आणि माहिती पुरवण्यात येईल.

  • लाभार्थी तसेच इतर व्यक्तींचे बँक खाते उघडणे
  • विविध प्रशिक्षण, रोजगार माहिती, विविध शासकीय योजनांतर्गतच्या संधी व माहिती
  • सामाजिक विकास योजनांची माहिती
  • UID / आधार कार्ड इ नोंदणी
  • वस्तू आणि उत्पादन नोंदणी माहिती
  • सेवा पुरवठादार यांची नोंदणी
  • स्थानिक पातळीवरील व्यवसायाच्या इतर संधी

शहर उपजीविका केंद्रासाठी बंधनकारक सेवा

व्यवसाय आराखडा बनवताना काही सेवा देणे बंधनकारक आहे. यात सेवा पुरवठादारांची नोंदणी, रोजगार उपलब्ध करून देणे, स्वयं सहाय्यता बचत गटांच्या व्यवसाय व उत्पादनास सहाय्य, छोट्या उद्योगांना सहाय्य करणे, अभियानांतर्गत लाभार्थ्यांचे व इतर व्यक्तींचे कर्ज प्रस्ताव तयार करण्यास सहाय्य्य, शासकीय योजनांचे साहाय्य, प्रशिक्षण साहाय्य, शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार करणे.

कोकण विभागात बचत गटांसाठी असलेल्या २९ शहर उपजिविका केंद्राला मान्यता

पुढील दहा दिवसात संपूर्ण राज्यात २१५ शहर उपजिविका केंद्राला मान्यता देण्यात येणार

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत कोकण विभागात बचत गटांसाठी असलेल्या २९ शहर उपजिविका केंद्राला मान्यता देण्यात आली असून लवकरच कोकणातील विविध भागात शहर उपजिविका केंद्र सुरु करण्यात येतील. तर पुढील दहा दिवसात संपूर्ण राज्यात २१५ शहर उपजिविका केंद्राला मान्यता देण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत कोकण विभागात बचत गटांसाठी असलेल्या २९ शहर उपजिविका केंद्राला मान्यता देण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन संपूर्ण राज्यात करण्यात आले आहे. पुणे, अमरावती, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोकण अशा विभागात होणाऱ्या या कार्यशाळेत शहर उपजिविका केंद्राला मान्यता देण्यात येणार आहे. यापैकी कोकण विभागाची कार्यशाळा नुकतीच पार पडली.

बचत गटांनी व्यवसाय सुरु केल्यावर त्यांना एका ठिकाणी मार्गदर्शनाचे व्यासपीठ उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यांच्या वस्तू आणि सेवांना शहर पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, आणि म्हणूनच शहर उपजिविका केंद्राअंतर्गत शहरी गरिबांना त्यांच्या सेवा आणि वस्तू संघटीत पध्दतीने आवश्यक व्यक्तींना उपलब्ध करून देता येऊ शकतील, शहर उपजिविका केंद्र हे शहरी गरीब उत्पादक व ग्राहक यांना जोडणारा दुवा असेल. या केंद्राच्या माध्यमातून शहरी गरीबांना व्यवसायासंबंधी आवश्यक सहकार्य मिळेल.

पूर्वी शहर उपजीविका केंद्राच्या नोंदणीसाठी वेळ लागायचा मात्र, त्याचे प्रस्ताव तयार करून घेणे, आणि ते मंजूर होणे हे काम एका दिवसात पूर्ण झालेले आहे, हा विक्रम आहे. यापुढे बचत गटांच्या समन्वयाने व्यवसाय आराखडा तयार करून पुढील एका वर्षात शहर उपजीविका केंद्र नफ्यात दिसणे अपेक्षित आहे, बचत गटांसाठी शहर उपजीविका केंद्र आदर्श ठरायला हवे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Twitter: https://twitter.com/MAHA_UDD

Instagram: https://www.instagram.com/maha_udd/

Blog: https://mahaudd.blogspot.com/

YouTube: https://www.youtube.com/channel/UCe9-Tq8QTPQ4h8IyXp2wbvw

LinkedInhttps://tinyurl.com/2bpdv9sv

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...