Monday, May 16, 2022

राज्यातील जाहिरात फलकांसाठी नियमावली

नगर विकास विभागातर्फे अधिसूचना जाहीर 

राज्यातील शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येणारे अनधिकृत जाहिरात फलक, त्यामुळे होणारे शहराचे विद्रुपीकरण आणि जाहिरात फलक पडून होणारे अपघात यावर तोडगा म्हणून नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे नियमावली लागू करण्यात येत असून या संदर्भातील अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी अनधिकृत जाहिरात फलकांमुळे होणाऱ्या विद्रुपीकरणाला यामुळे आळा बसणार असून जाहिरात फलक नियमाचे काटेकोर पालन करून लावण्यासाठी या नियमावलीचा उपयोग होणार आहे.

जाहिरात फलक उभारण्याकरिता निर्देश 

सर्वसाधारण निर्देश 

- जाहिरात फलक गंजू नये त्याला वेळोवेळी रंग देऊन यथोचितरित्या सुस्थितीत ठेवण्यात यावे. त्याच्या सुरक्षिततेसाठी सर्व सांध्यांची नियतकालाने तपासणी करण्यात यावी. 

- महानगरपालिकेचा परवानगी क्रमांक आणि जाहिरात कंपनीचे नाव ठळक ठशात प्रदर्शित करणे अनिवार्य केले आहे. नवीन रोमन अंकात हि अक्षरे काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाने ६ इंच इतकी मोठी असावीत. 

- जाहिरात फलकांची उभारणी आवश्यक असेल तेथे यंत्राद्वारे उभारणी करण्यात यावी आणि कोणताही अपघात होऊ नये यासाठी सर्व सावधगिरीची उपाययोजना करण्यात यावी. 

- जाहिरात फलक उभारल्यामुळे वाहनांच्या व पादचाऱ्यांच्या जाण्यायेण्याच्या, वाहतुकीच्या उपद्रवास किंवा गैरसोयीस प्रतिबंध होण्यासाठी आवश्यक ती सावधगिरी घेण्यात येईल.

-वाहन चालकांच्या डोळ्यावर तिरीप येईल इतक्या प्रखरतेची रोषणाई केलेला जाहिरात फलक प्रदर्शित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. 

-सर्व प्रक्रिया विहित कालावधीत होण्याच्या दृष्टिकोनातून, संपूर्ण प्रक्रिया सुरुवातीपासून अखेरपर्यंत वन विंडो पद्धतीनुसार ऑनलाईन प्रक्रियेने राबवण्यात याव्यात.

जाहिरात फलकाच्या उंचीची मर्यादा आणि आकार 

- जाहिरात फलक ज्या मार्गावरून दिसणार आहेत त्या रस्त्याच्या पातळीपासून ४० फूट पेक्षा अधिक उंचीचे जाहिरात फलक उभारले जाणार नाहीत. 

उपद्रव आणि प्रदूषणास प्रतिबंध 

- मालमत्तेचे मालक, भाडेकरू किंवा भोगवटादार आणि सर्वसामान्य लोक यांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव किंवा गैरसोय होण्यास प्रतिबंध करण्याबाबत, मालमत्तेची कोणतीही हानी व कोणत्याही प्रकारे प्रदूषण होण्यापासून प्रतिबंध करण्याची सावधगिरी घेण्यात यावी.

- स्वतःच्या खर्चाने आणि महानगरपालिकेच्या समाधानासाठी कामाची अंमलबजावणी करत असताना रस्ते, पदपथ किंवा सार्वजनिक, खासगी मालमत्ता याचे कोणतेही नुकसान झाल्यास भरून देणे.

-कोणताही जाहिरात फलक जेथे तो उभारण्यात आला असेल त्या इमारतीच्या जवळच्या किंवा इमारतीमधील मालमत्तेचे कोणतेही दरवाजे आणि खिडक्या यांना चिकटून जाहिरात फलक लावता येणार नाही. 

- जाहिरात फलकांची उभारणी केल्यावर आजूबाजूच्या जागेवरील कचरा स्वच्छ करण्यात यावा. 

संरचनात्मक निर्देश 

- संरचना चौकट सुरक्षेच्या दृष्टीने संरचना महानगरपालिका मान्यता प्राप्त अभियंत्याने दिलेल्या आराखड्यानुसार व आवश्यक खांबाच्या आधारावर उभारणे अपेक्षित आहे.

विद्युतीकरण 

विद्युत अभियंत्यांकडून विद्युत उपकरणे विद्युत उपकरणांची मांडणी, दिवे व दिव्यांच्या प्रकाशझोताची तीव्रता तसेच विद्युत उपकरणे व दिव्यांचा दर्जा याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 

Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Twitter: https://twitter.com/MAHA_UDD

Instagram: https://www.instagram.com/maha_udd/

Blog: https://mahaudd.blogspot.com/

YouTube https://www.youtube.com/channel/UCe9-Tq8QTPQ4h8IyXp2wbvw


No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...