Tuesday, March 1, 2022

बदलत्या महाराष्ट्राचा शाश्वत विकास


By far the greatest and most admirable form of wisdom is that needed to plan and beautify cities and human beings.
-- Socrates 

ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस याचे शहर नियोजन आणि विकास यासंदर्भातील हे शब्द कुणाही शहर नियोजकाला, रचनाकाराला किंवा अगदी सामान्य नागरिकालाही विचार करायला भाग पाडतात. 

कल्पनाशक्ती आणि नियोजन यातूनच प्रगती साधत भविष्याला आकार देता येऊ शकतो असे सॉक्रेटिसच्या विधानातून स्पष्ट होते. 

भारतातील राज्यांचा दिवसेंदिवस होणारा विकास पाहता सॉक्रेटिसचे विधान या राज्यांसाठीच असल्याचे दिसून येते. औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक असे क्षेत्र कोणतेही असो विविधता आणि वेगवेगळ्या संधींची अनोखी  समीकरणे भारतातील अनेक राज्यात पाहायला मिळतील. विशेष म्हणजे या सगळ्यात महाराष्ट्राने आपला अनोखा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या 'मुंबई'सारख्या शहरामुळे गेल्या काही वर्षात विकासाचे आणि उत्कृष्ट नागरीकरणाचे आदर्श राज्य अशी ओळख महाराष्ट्राला लाभली. 

मुंबईसोबतच ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद या इतर शहरांचा विकास झपाट्याने होत असताना  महाराष्ट्राचे रूप सर्वांगाने बदलत होते. व्यवसायाच्या विविध संधी, प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, प्रगत आरोग्यसुविधा, विरंगुळ्याची उत्तमोत्तम ठिकाणे अशा नागरिकांची जीवनशैली उंचावणाऱ्या नव्या शहरीकरणाचा जन्म होऊ लागला. 

उपलब्ध सोयीसुविधांमुळे मुख्य शहरात  लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी  नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर धोरण नियोजक, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सिडको, एमएमआरडीए यासारख्या संस्थांनी केलेल्या प्रभावी नियोजनामुळे या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची स्वप्न आकाराला येऊ लागली आहेत. 

गेली अनेक वर्षे नगर विकास विभागाला लाभलेले उत्कृष्ट नेतृत्त्व आणि कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी यांनी दूरदृष्टी ठेवून केलेले नियोजन आणि महाराष्ट्रातील सर्व शहरात केलेले काम यातूनच हा विकास साद्ध्य झालेला दिसतो. 

नव्याने होत असलेल्या शहरीकरणात आरोग्य आणि उत्तम दर्जाचे राहणीमान याला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने नगर विकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून एका नव्या शहरीकरणाचा जन्म होत आहे. कोरोनाच्या काळात मा. मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणच्या महापुरात पीडित नागरिकांना मदत व पुनर्वसन कार्यात दाखवलेली तत्परता, गडचिरोली जिल्ह्यात उभारलेल्या पायाभूत सुविधा, नक्षलवाद्यांसाठी आखलेली आत्मसमर्पण मोहीम व त्यांचे केलेले पुनर्वसन, ठाणे शहराचा केलेला सर्वांगीण विकास व नूतनीकरण हे खऱ्या अर्थाने शहरी विकासाचे द्योतक आहे. क्लस्टर योजनेच्या माध्यमातून शहरांचा पुनर्विकास, प्रदूषणमुक्त प्रवास साधण्यासाठी विद्युत वाहन सुविधेला दिलेली चालना, बिझनेस पार्क तसेच शहरांतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत  नागरिकांना उपलब्ध केलेल्या  सोयीसुविधा पुरवणे इत्यादी परिवर्तनाचे उपक्रम या विभागातर्फे यशस्वीरीत्या राबवले जात आहेत. या नियोजनात त्यांच्या सोबतीला आहेत, नगर विकास राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे.

नगर विकास विभाग (१ ) प्रधान सचिव भूषण गगराणी, नगर विकास विभाग (२) प्रधान सचिव महेश पाठक यांनी कार्यक्षम नागरी सेवेची आखणी करताना शहरांचा शाश्वत विकास आणि नागरिकांच्या प्रगतीचे नवे ध्येय ठेवले आहे.  क्लस्टर योजनेच्या माध्यमातून शहरांचा पुनर्विकास, प्रदूषणमुक्त प्रवास साधण्यासाठी विद्युत वाहन सुविधेला दिलेली चालना, बिझनेस पार्क तसेच शहरांतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत गरीब नागरिकांना उपलब्ध केलेल्या  सोयीसुविधा पुरवणे इत्यादी परिवर्तनाचे उपक्रम या विभागातर्फे यशस्वीरीत्या राबवले जात आहेत. 

 या नियोजनबद्ध आखणीमुळेच महाराष्ट्रातील शहरी नागरीकरण आणि नागरिकांचा विकास अन्य राज्यांसाठी एक आदर्श ठरेल, हे निश्चित..


No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...